धक्कादायक : वीज खंडीत केली जाणार.. मॅसेजवर विश्‍वास ठेवला.. दीड लाखाला चुना लागला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । तुम्ही मागच्या महिन्याचे वीज बील भरलेले नाही. आज रात्री तुमची वीज खंडित केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबतच्या क्रमांकावर संपर्क साधा, असा मॅसेज मोबाईलवर आला. वीज ग्राहकाने त्यावर विश्‍वास ठेवला आणि दीड लाखाला चुना लागला. ही घटना बीड शहरातील धोंडीपुरा भागातून समोर आली.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील धोंडीपुरा भागात राहणार्‍या धनंजय भास्कर डोंगरे (वय ५१) यांना १८ जून रोजी दुपारी १२ वाजता एका मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला. त्यामध्ये तुम्ही मागच्या महिन्याचे बील भरलेले नाही. त्यामुळे आज रात्री ९.३० वाजता तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे लिहीले होते.

त्यावर विश्‍वास ठेवून धनंजय डोंगरे यांनी त्या क्रमांकावर संपर्क केला असता मी महावितरणचा अधिकारी बोलत असून तुम्ही टीम व्ह्युअर अ‍ॅप्लीकेशन (Team Viewer App)  डाऊनलोड करा, असे सांगितले.

त्याचा पासवर्ड डोंगरे यांनी संबंधिताला सांगताच, त्याच्याकडे मोबाईलचे अ‍ॅक्सेस गेले. त्यानंतर त्याने डोंगरे यांच्या बँक अकाऊंटमधून तीन वेळेस पन्नास हजार रुपये असे एकूण दीड लाख रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डोंगरे यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रवि सानप करीत आहेत.

आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको – उध्दव ठाकरेंचा इशारा

काय असतो त्या घोटाळेबाज टोळीचा मॅसेज

1) आज रात्री 10: 30 वाजता तुमचा वीज पुरवठा बंद होणार… हे टाळण्यासाठी अमुक (98**6**9**0) नंबरवर तातडीने संपर्क साधा.

2) आजच्या आज वीज बील भरा किंवा रजिस्ट्रेशन चार्ज भरा नाहीतर आज रात्रीच वीज कापली जाईल असं सांगितलं जातं.

घोटाळेबाज टोळी नेमकं काय करते ?

ग्राहकांनी संबंधित नंबरवर संपर्क करताच त्यांना आधी वेगवेगळ्या गोष्टी भुलवून खरंच वीज पुरवठा बंद होणार आहे असे भासवले जाते, एक ऑनलाईन प्रोसिजर करावी लागेेल यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Any desk, TeamViewer, Quick Support या सारखे App डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते. इथेच ग्राहक फसतात.

आळंदीला निघालेल्या वारकर्‍यांच्या गाडीला भीषण अपघात, 30 वारकरी जखमी तर एकाचा मृत्यू

घोटाळेबाज टोळीचा मायावी खेळ

एकदा का आपण Any desk, Team Viewer, Quick Support सारखे ॲप डाऊनलोड केले की, मग त्या घोटाळेबाज टोळीचा मायावी खेळ सुरु होतो, ॲप डाऊनलोड होताच आपल्या मोबाईलमध्ये असलेला सर्व डेटा, एक्सेस कोड, आणि अगदी पैसे सुध्दा गायब करतात. एकदा का आपले पैसे गायब झाले की मगच आपले डोके ठिकाणावर येते आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

Any desk,TeamViewer, Quick Support या App चा उपयोग काय ?

Any desk, TeamViewer, Quick Support या App चा जगभरातील करोडो IT व्यवसायिक करतात. याचा वापर तांत्रिक समस्यांमध्ये मदत करण्यासाठी होता. दुर असलेल्या ग्राहकांच्या उपकरणांशी कनेक्ट होण्यासाठी Any desk, Team Viewer, Quick Support या सारख्या रिमोट एक्सेस ॲपचा उपयोग केला जातो.

उस्मानाबाद | राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या गाडीवर गोळीबार

या सर्व प्रकाराशी महावितरणचा संबंध असतो का?

आज रात्री साडे दहा वाजता तुमचा वीज पुरवठा बंद होणार अश्या स्वरूपाचे कुठलेही मॅसेज महावितरण पाठवत नाही. MSEDCL हे महावितरणचे अधिकृत ॲप आहे. या ॲप शिवाय कुठलेही ॲप डाऊनलोड करायला महावितरण कधीच आपल्या ग्राहकांना सांगत नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Agnipath scheme | अग्निपथ योजनेबाबत लष्कराची मोठी घोषणा, अग्निपथ योजनेच्या हिंसाचारात सहभागी तरुणांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

online फसवणूकीपासून असा करा बचाव

सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमांतून online फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. फसवणूकीसाठी स्कॅमरकडून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या कुठल्याही मॅसेजवर पटकन विश्वास ठेवण्याआधी त्याच्या सत्यतेची खात्री करा. त्यासाठी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आपल्या परिचित महावितरण अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सत्य जाणून घ्यावे.त्या आधी कुठलेही ॲप डाऊनलोड करुन घेऊ नये.

जामखेड टाइम्सच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

आज रात्री तुमचा वीजपुरवठा खंडित होणार आहे अशा स्वरूपाचे मेसेज पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना राज्यात घडत आहेत. त्यासंदर्भात 18 जून रोजी जामखेड टाइम्सने सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती.ऑनलाइन फसवणूक कश्या प्रकारे केली जाते, याबाबत सविस्तर माहिती त्या बातमीत दिली होती.जामखेड टाइम्सच्या वृत्तावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

Eknath Khadse। भाजपात दोन नव्हे तर अनेक समर्थक, मात्र…

नागरिकांना अवाहन

नागरिकांनी ऑनलाइन आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी कुठल्याही मेसेज वर विश्वास ठेवू नये, यदाकदाचित अशा स्वरूपाचे मेसेज आल्यास आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी अथवा महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित मेसेजची खात्री पटवून घ्यावी त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा असे आवाहन टीम जामखेड टाइम्स आपणास करत आहे.

Jamkhed news (1371) jamkhed news today (100) Jamkhed Times (1342) jamkhed times news (1298) maharashtra latest news (1904) Maharashtra Letest News (1875) MLA Rohit Pawar (120) कर्जत जामखेड च्या बातम्या (1351) जामखेड (1316) जामखेड च्या ताज्या बातम्या (1312) जामखेड च्या बातम्या (1326) जामखेड टाईम्स (1325)