आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको – उध्दव ठाकरेंचा इशारा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेत गद्दार आता कुणीही राहिला नाही. कितीही फाटलं तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच मागे एकदा फाटाफूट झाली होती, त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको.तो आज काय उद्या सुद्धा मला नको आहे’ असं म्हणत विधान परिषदेच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत नाराजांना सुनावलं.(cm uddhav balasaheb thackery speech shiv sena 56th anniversary)

शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी कडक इशारा दिला.

‘आमदार, मुख्यमंत्री,खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजूया.उद्याची निवडणूक आहे. मला निवडणुकीची चिंता नाही. हार जीत तर होतच असते. मी ठामपणे सांगतो आम्ही जिंकणारच आहोत.

मागे राज्यसभा निवडणुकीत झालं ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटलं ते सगळं समोर आलंय. हळूहळू ते कळेलच, असं सूचक विधानही उद्धव ठाकरे यांनी केलं. तसंच, उद्या विधान परिषदेत फाटाफुटीची शक्यता बिल्कूल वाटत नाही.

शिवसेनेत गद्दार आता कुणीही राहिला नाही. कितीही फाटलं तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. अशीच मागे एकदा फाटाफूट झाली होती, त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. तो आज काय उद्या सुद्धा मला नको आहे. अजिबात सुद्धा नको आहे, अनेकांनी शिवसेना मोठी केली पण त्यांना हे बघायला मिळाले नाही. त्यांना भोगले नाही, आपल्याला मिळतंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराजांना इशारा दिला.