कर्जत जामखेडच्या विधानसभा उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “रामभाऊ चिंता करू नका मी तुमचा बेरर चेक आहे. त्याच्यावर किंमत तुम्ही टाकायची आहे. सही मी केलेली आहे. त्यामुळे जेवढ्या योजना तुम्ही मागाल तेवढ्या योजना निश्चितपणे मार्गी लागतील असे सांगत आगामी विधानसभेसाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या उमेदवारीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.”

Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Karjat Jamkhed's Assembly candidature

अहमदनगर (अहिल्यानगर) दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ जामखेडमध्ये भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार सुरेश धस, माजी आमदार भिमराव धोंडे, चित्राताई वाघ, उमेश पाटील सह आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्याच्या हिस्साचे जे पाणी पळवून नेले होते ते अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मराठवाड्यात परत आणले आहे. त्यासाठी 1400 कोटी रूपये दिले.त्यातून आष्टीसह आदी भागाला पाणी येणार आहे. रामभाऊंनी जामखेड तालुक्यासाठी पाण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सुरेश आण्णांना वाटलं की रामभाऊ आता ते पाणी पळवून नेतात की काय ? पण  नाही आण्णा तुम्ही पण माझ्या तेवढ्याच जवळचे आहात. मराठवाड्याचे पाणी पळवले जाणार नाही.

Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Karjat Jamkhed's Assembly candidature

रामभाऊ तुम्ही चिंता करू नका आता आम्ही नवीन योजना हाती घेतली आहे. कृष्णा नदीला येणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाला देण्याची ही योजना असणार आहे. 4000 कोटी रूपयांची ही योजना आहे. कृष्णा नदीला येणाऱ्या पुराचे पाणी दरवर्षी वाहून जाते. ते पाणी डायव्हर्शन कॅनाॅलच्या माध्यमांतून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह मराठवाड्यात घेऊन जाणार आहोत, हे जे अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्या पाण्यावर  जामखेडसाठी योजना करता येईल का ? हे पडताळून बघू, जामखेड तालुक्यालाही दिलासा देण्याचा प्रयत्न करू असा शब्द यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.

Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Karjat Jamkhed's Assembly candidature

पश्चिमी वाहिन्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी हे देखील अहमदनगर जिल्ह्यात आणून नगर नाशिक आणि मराठवाड्यात नेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. त्यामुळे काळजी करू नका आपण ठरवलयं की आगामी काळात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दुष्काळ संपवणार आहोत, नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचे धोरण महायुती सरकारचे आहे. जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर भागाकरिता सुरू असलेले जल सिंचणाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करूण देण्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली

Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Karjat Jamkhed's Assembly candidature

रामभाऊ शिंदे ज्या वेळेस पालकमंत्री होते. मंत्री होते, आमदार होते. त्यांच्या माध्यमांतून या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला.त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. मागच्या विधानसभेत आपण दुसरे आमदार निवडून दिले. त्यांना निवडून दिल्यानंतर बोलबच्चन शिवाय काहीच मिळालं नाही. महायुतीचं सरकार आल्याबरोबर रामभाऊ शिंदे आमदार झाले. त्यानंतर एमआयडीसीचा असो, पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, रस्त्यांच्या योजना असो, या सगळ्या योजना या मतदारसंघात पुन्हा एकदा सुरु झाल्या. या भागाच्या विकासासाठी आमदार प्रा राम शिंदे हे मोठी मेहनत घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत त्या पुन्हा एकदा निवडून द्या. या भागाच्या विकासासाठी भरिव निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

Big announcement by Deputy Chief Minister Devendra Fadnavis regarding Karjat Jamkhed's Assembly candidature

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही निवडणूक गल्लीतील निवडणूक नसून देशाचा नेता ठरवणारी निवडणूक आहे. या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, देशाला कोण विकासाकडे नेवू शकतो. आणि सामान्य मानसाच्या आशा आकांक्षा पुर्ण करू शकतो याचा फैसला करणारी निवडणूक आहे. यामुळे पंतप्रधान पदांची संगीत खुर्ची खेळणाऱ्यांच्या मागे जावू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास  म्हणत देशाला विकासात पुढे आणले आहे. यामुळे डॉ. सुजय विखे यांना मत म्हणजे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत ही जाणीव ठेवा असा सल्ला दिला.

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागील १० वर्षात पंतप्रधान मोंदीच्या मार्फत झालेल्या कामांचा पट जनतेसमोर मांडत इंडी आघाडीचा सडेतोड समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, मोदींकडे विकासाची गाडी असून त्यात महायुतीच्या पक्षांचे डबे आहेत आणि त्यात सर्व सामान्य जनतेला जागा आहे. तर इंडीकडे केवळ इंजिन आहेत आणि इंजिनमध्ये कुणाला जागा नाही.

कॉंग्रेसच्या काळात ऊस शेतकऱ्यांवर १० हजार कोटी रुपयांचा इनकम टॅक्स होता. पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी कायदा बदलून हा टॅक्स रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याच बरोबर मोदी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास वीज दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे यांनी मागील पाच वर्षात जिल्ह्यात विकासाची भरगोस कामे केली आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारचा दुष्काळ कमी करण्यासाठी त्यांनी विविध मागण्या केल्या आहेत. येणाऱ्या काळात सुजय विखेंच्या माध्यमांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा दुष्काळ आपल्याला संपवायचा आहे. यामुळे येत्या १३ तारखेला कमळ चिन्हाचे बटण दाबून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार सुरेश अण्णा धस, आमदार राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, चित्राताई वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, एकदा पक्षाने उमेदवारीचा निर्णय घेतला की मनात कुठलाही किंतू परंतू मनात न आणता पक्षाचे काम करायचे ही भाजपची संस्कृती आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पक्षाने घेतलेला निर्णय जामखेड तालुक्यातील सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षादेश मानून कामास सुरुवात केली आहे. महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील यांना मागच्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत अधिक मताधिक्य देण्याचा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला.

जामखेड तालुका हक्काच्या पाण्याबाबत वंचित असल्याच्या बाबी कडे आमदार प्रा.राम शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधत कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेतून जामखेडला पाणी देण्याची मागणी केली. त्याचबरोबर कर्जत व जामखेड एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावून या दोन्ही एमआयडीसीत मोठे उद्योग आणून मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांच्या हाती रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. आमदार प्रा राम शिंदे यांनी केलेल्या सर्व मागण्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत आमदार शिंदे यांनी केलेल्या सर्व मागण्या तातडीने मार्गी लावण्याचा शब्द जानखेडकरांना दिला. महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ जामखेड बाजारतळ परिसरात पार पडलेल्या जाहीर सभेत फडणवीस यांनी जानखेडकरांची मने जिंकली.