Eknath Khadse। भाजपात दोन नव्हे तर अनेक समर्थक, मात्र…

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानपरिषद निवडणुकीसाठी (vidhan parishad election maharashtra) उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) हे उमेदवार आहेत. आज त्यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर (MLA Hitendra Thakur) यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Senior NCP leader Eknath Khadse called on Bahujan Vikas Aghadi leader MLA Hitendra Thakur)

भाजपमध्ये (bjp) असताना अनेकांना तिकीट मिळवून देण्यासाठी मदत केली, मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठीही मदत केली.त्यामुळे भाजपमधील अनेक जण माझ्यावर आजही प्रेम करतात, मात्र पक्ष सोडून ते मला मतदान करतील असे वाटत नाही, प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी असते, अनेक जण माझ्या संपर्कात आहेत असा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Senior NCP leader Eknath Khadse) यांनी केला.

विधान परिषद निवडणुकीमध्ये आपले सर्वच उमेदवार निवडून आणायचे यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी दोन्ही गटातील नेते छोट्या पक्षांसह इतर अपक्षांना गळ टाकताना दिसत आहेत. याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.(Senior NCP leader Eknath Khadse called on Bahujan Vikas Aghadi leader MLA Hitendra Thakur)

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की आमदार हितेंद्र ठाकूर (MLA Hitendra Thakur) यांच्याशी माझे गेल्या 32 वर्षांपासून संबंध आहेत, राजकारणापलीकडे आम्ही दोघे एकमेकांना चांगले ओळखतो, म्हणून मी त्यांना शब्द मागायला आलो नव्हतो तर मत मागण्यासाठी आलो होतो. शेवटी मतदान कोणाला करायचे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जळगावचे दोन आमदारच माझे समर्थक आहेत असं नाही, तर भाजपमध्ये माझे अनेक समर्थक आहेत, आजही ते माझ्यावर प्रेम करतात परंतु ते मला पक्ष सोडून मतदान करतील असे वाटत नाही, असे महत्त्वाचे विधान यावेळी खडसे यांनी केले.

हेही वाचा : अग्निपथ योजनेबाबत लष्कराची मोठी घोषणा

हेही वाचा : आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको

हेही वाचा : आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात

Jamkhed news Jamkhed Times jamkhed times news maharashtra latest news Maharashtra Letest News MLA Rohit Pawar कर्जत जामखेड च्या बातम्या जामखेड जामखेड च्या ताज्या बातम्या जामखेड च्या बातम्या जामखेड टाईम्स