महावितरण विरोधात गुरूवारी जवळ्यात होणार रास्ता रोको अंदोलन – प्रशांत शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महावितरणच्या जवळा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या कृषी वहिनी व गावठाणमधील सर्व लाईन दुरुस्त करण्यात यावेत या मागणीसह जवळेश्वर महाराज यात्रे निम्मित रथ मार्गावरील सर्व लाईन दुरुस्त करण्यात यावीत या मागणीसाठी जवळा ग्रामपंचायत व शेतकरी बांधवांच्या वतीने उद्या गुरुवारी रास्ता रोको आंदोलन हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती युवा नेते प्रशांत शिंदे यांनी दिली.

Rasta Roko Andolan will be held jawala on Thursday against Mahavitran - Prashant Shinde

महावितरणच्या गलथान कारभाराचा मोठा फटका जवळा परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. यामुळे जनतेत संतापाचे वातावरण आहे. महावितरणच्या विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी जवळा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन होणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक,  समतानगर, जवळा येथे हे अंदोलन पार पडणार आहे.

महावितरणच्या विविध प्रश्नांबाबत महावितरणला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युवा नेते प्रशांत शिंदे, सरपंच सुशील आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य व भाजपा नेते प्रशांत बाप्पु पाटील, माजी उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य सावता हजारे, प्रदीप हजारे , संतराम सुळ, युवा नेते अमोल हजारे सह आदी उपस्थित होते. उद्या गुरुवारी होणाऱ्या रास्ता रोको अंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन युवा नेते प्रशांत शिंदे यांनी केले आहे.

जवळा येथील ३३/११ केव्ही अंतर्गत पावसाळापूर्वीचे दुरुस्ती तात्काळ करावी, जवळा ३३/११ केव्ही अंतर्गत सुरु असलेला वीजपुरवठा सतत नादुरुस्त असल्याने शेतक-यांचे अनेक अडचणींना तोंड ‌द्यावे लागत आहेत. तसेच मागील आठवड्‌यात वादळी पावसाने विजेचे खांब पडले आहेत ते तात्काळ दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच जवळा सबस्टेशन जुनियर अभियंता यांची नियुक्ती करावी. अशी मागणी जवळा ग्रामपंचायत वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे दखल घेतली नाही तर १३ जून रोजी जवळा फाटा (छत्रपती शिवाजी चौक, समता नगर) येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहोत, असा इशारा देण्यात आला आहे.

खालील मागण्यांसाठी होणार रास्ता रोको अंदोलन

१. पावसाळ्यापूर्वीची Maintenance ची कामे करावीत.
२. वादळात झालेल्या पडझडीत पडलेल्या पोलचे व तुटलेल्या तारांची दुरुस्ती करून घ्यावीत.
3. 33 KV खड़ी लाईन चे कायमस्वरूपीचे दुरुस्ती कामे करावीत.
४. MSEB ची Maintenance ची कामे करण्यासाठी आणखीन २-३ ठेकेदारांची नेमणूक करावी.
५ . जवळा सबस्टेशनला कायमस्वरूपी जुनियर अभियंता नेमणूक करावी.
६. बाजार तळातील मेन लाईन नदीच्या कडेस शिफ्ट करण्यात यावे.

७. जवळा सोसायटी समोरील मेन लाईन वा लाईन चे गाळे दुरुस्त करण्यात यावेत.
८. सावतामाळी मंदिर परिसरातील DP शिफ्ट करण्यात यावी.
९.जवळेश्वर यात्रेपूर्वी गावठाणातील गाळ्यांची उंची वाढवण्यात यावी व दुरुस्त करावी

Rasta Roko Andolan will be held jawala on Thursday against Mahavitran - Prashant Shinde