आळंदीला निघालेल्या वारकर्‍यांच्या गाडीला भीषण अपघात, 30 वारकरी जखमी तर एकाचा मृत्यू

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । आळंदीला (Alandi Wari)  वारीसाठी निघालेल्या वारकर्‍यांच्या (Warakari)  गाडीला भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 30 वारकरी गंभीर तर 11 वारकरी (varkari) किरकोळ जखमी झाले, तर एका वारकऱ्यांचा जागेवर मृत्यू झाला आहे. तसेच एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज पहाटे साताराजवळील शिरवळ (satara shirval accident) नजीक घडली.

याबाबत सविस्तर असे की, कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटे येथील वारकरी आळंदीला निघाले होते. हे सर्व वारकरी ट्रॅक्टर ट्रॉलीमधून आळंदीच्या दिशेने जात असतानाच पुण्याकडे (pune) भरधाव वेगाने जात असलेल्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागुुन जोराची धडक दिली.

सर्व वारकरी झोपेत असतानाच भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातातील जखमींवर शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डॉ जोगळेकर हॉस्पिटलमध्ये (dr jogalekar Hospital Shirval) उपचार सुरू आहेत.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन एक ट्रॅक्टर आळंदीला निघाला होता. या ट्रॅक्टर ट्रॉलीला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ट्रॉलीमध्ये बसलेले वारकरी रस्त्यावर फेकले गेले होते.

या अपघातात वारकऱ्यांच्या हाता पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर एका वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच सर्व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले होते सर्व जखमींवर आता उपचार सुरू आहेत या अपघातातील जखमींची नावे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.