MSEDCL | वीज ग्राहकांनो सावधान आज रात्री तुमचा वीज पुरवठा बंद होणार… काय आहे यामागचे सत्य ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। MSEDCL ।वीज ग्राहकांनो सावधान… आज रात्री 10: 30 वाजता तुमचा वीज पुरवठा (power supply) बंद होणार… हे टाळण्यासाठी अमुक (98**6**9**0) नंबरवर तातडीने संपर्क साधा असा संदेश SMS किंवा WhatsApp द्वारे पाठवला जाण्याचे प्रमाण वाढले, अचानक येणाऱ्या या मेसेजेस वीजग्राहक (Power consumers) हैराण झाले आहेत. यामागचं नेमकं सत्य काय आहे? हे जाणुन घेऊयात !

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, महावितरण कंपनी (MSEDCL) रात्री अपरात्री अचानक वीज पुरवठा कसे काय बंद करु शकते ? परंतू असे काही तुमच्या बाबतीत घडणार नाही, कारण वीज गेली तर सगळ्यांचीच जाईल, तीही रोज जाते तशी.

राम शिंदेंच्या विजयानंतर चोंडीत गावकऱ्यांचा विजयी जल्लोष

पण आपल्या मोबाईलवर आलेला मेसेज खरा आहे का? हेही आपण तपासुुन बघत नाही, त्या मेसेजमधील ‘वीज बंद होणार’ या मजकुराने आपण परेशान होऊन जातो. मग आपण त्या मॅसेजमधील नंबरवर संंपर्क साधतो आणि इथेच सुरु होतो घोटाळेबाज टोळीचा मायावी खेळ.

काय असतो त्या घोटाळेबाज टोळीचा मॅसेज

1) आज रात्री 10: 30 वाजता तुमचा वीज पुरवठा बंद होणार… हे टाळण्यासाठी अमुक (98**6**9**0) नंबरवर तातडीने संपर्क साधा.

2) आजच्या आज वीज बील भरा किंवा रजिस्ट्रेशन चार्ज भरा, नाहीतर आज रात्रीच वीज कापली जाईल असं सांगितलं जातं.

भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा एकदा दे धक्का, भाजपचे सर्व उमेदवार विजयी, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत !

घोटाळेबाज टोळी नेमकं काय करते ?

ग्राहकांनी संबंधित नंबरवर संपर्क करताच त्यांना आधी वेगवेगळ्या गोष्टी भुलवून खरंच वीज पुरवठा बंद होणार आहे असे भासवले जाते, एक ऑनलाईन प्रोसिजर करावी लागेेल यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Any desk, TeamViewer, Quick Support या सारखे App डाऊनलोड करण्यास भाग पाडले जाते. इथेच ग्राहक फसतात.

घोटाळेबाज टोळीचा मायावी खेळ

एकदा का आपण Any desk,TeamViewer, Quick Support सारखे ॲप डाऊनलोड केले की, मग त्या घोटाळेबाज टोळीचा मायावी खेळ सुरु होतो, ॲप डाऊनलोड होताच आपल्या मोबाईलमध्ये असलेला सर्व डेटा, एक्सेस कोड, आणि अगदी पैसे सुध्दा गायब करतात. एकदा का आपले पैसे गायब झाले की मगच आपले डोके ठिकाणावर येते आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

Maharashtra Vidhan Parishad election results 2022 LIVE : आखिर वो लौट आया, राम शिंदेंचा विधान परिषदेत दणदणीत विजय,

Any desk,TeamViewer, Quick Support या App चा उपयोग काय ?

Any desk, TeamViewer, Quick Support यासारख्या App चा जगभरातील करोडो IT व्यवसायिक करतात. याचा वापर तांत्रिक समस्यांमध्ये मदत करण्यासाठी होता. दुर असलेल्या ग्राहकांच्या उपकरणांशी कनेक्ट होण्यासाठी Any desk, TeamViewer, Quick Support या सारख्या रिमोट एक्सेस ॲपचा उपयोग केला जातो. परंतू स्कॅमर लोक याच ॲपच्या माध्यमांतून आपल्या मोबाईलमधील डेटा आणि पैसे चोरतात.

या सर्व प्रकाराशी महावितरणचा संबंध असतो का?

आज रात्री साडे दहा वाजता तुमचा वीज पुरवठा बंद होणार अश्या स्वरूपाचे कुठलेही मॅसेज महावितरण पाठवत नाही. MSEDCL हे महावितरणचे अधिकृत ॲप आहे. या ॲप शिवाय कुठलेही ॲप डाऊनलोड करायला महावितरण कधीच आपल्या ग्राहकांना सांगत नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

खळबळजनक  : एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला !

online फसवणूकीपासून असा करा बचाव

सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमांतून online फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. फसवणूकीसाठी स्कॅमरकडून वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या कुठल्याही मॅसेजवर पटकन विश्वास ठेवण्याआधी त्याच्या सत्यतेची खात्री करा. त्यासाठी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा आपल्या परिचित महावितरण अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सत्य जाणून घ्यावे.त्या आधी कुठलेही ॲप डाऊनलोड करुन घेऊ नये.

Power consumers, beware, your power supply will be cut off tonight ... What is the truth behind this?