Maharashtra Vidhan Parishad election 2022 LIVE : राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडींना वेग, दुपारपर्यंत काय घडलं ? वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Maharashtra Vidhan Parishad election 2022 LIVE । महाराष्ट्र विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदान सुरु झाले असून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे समोर येत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आमदार फोडाफोडी करण्यासाठी राजकीय पक्ष काम करताना दिसत आहे.

विधान परिषद निवडणूकमध्ये भाजपकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय,  उमाताई खापरे, प्रसाद लाड, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेकडून सचिन आहिर, आमश्या पाडवी तर काँग्रेस कडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे असे अकरा उमेदवार रिंगणात आहेत या अकरा उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे.

अपक्ष आमदार विनोद अग्रवाल भाजपच्या तंबूत दाखल

दरम्यान सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात वेगवान राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे गोंदिया जिल्ह्यातील अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे भाजपच्या गोटात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे, राज्यसभा निवडणुकीमध्ये विनोद अग्रवाल हे महाविकास आघाडीच्या तंबूत होत, मात्र विधान परिषद निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्याचे स्पष्ट होत आहे. हॉटेल ताज मधील भाजपच्या बैठकीला अग्रवाल यांनी हजेरी लावली होती.

कर्जत जामखेडला मिळणार दुसरा आमदार, उत्सुकता शिगेला, विधानपरिषदेचे मतदान सुरू !

राष्ट्रवादीचे तीन आमदार असून मुंबईत दाखल नाहीत

तर दुसरीकडे राष्ट्रवादीची चिंता वाढणारी एक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते हे नाराज असून ते अजूनही मुंबईला दाखल झाले नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची मुख्यमंत्र्यांवरील नाराजी अजूनही दूर झालेली नाही. तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हेही अजून मुंबईला पोहोचलेले नाहीत, आमदार अण्णा बनसोडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते अजूनही मुंबईला पोहोचलेले नाहीत.

खळबळजनक : अहमदनगर जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल, 10 जिवंंत काडतुसांसह तिघांना बेड्या, एलसीबीची धडक कारवाई

राष्ट्रवादीचे आमदार लवकरच मुंबईत दाखल होतील असे राष्ट्रवादीकडून सांगत आले. राज्यसभा निवडणुकीवेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे नाराजी नाट्य रंगले होते आता विधान परिषद निवडणुकीतही त्यांचे नाराजी नाट्य रंगले आहे. मोहिते हे सध्या नॉटरिचेबल असल्याची ही माहिती समोर येत आहे राष्ट्रवादी मोहिते यांची नाराजी कशी दूर करणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष कुणाच्या बाजूने जाणार

विधानपरिषद निवडणूकमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला सर्वाधिक महत्त्व आलेले आहे. या आघाडीकडे तीन आमदारांचे संख्याबळ आहे. विधानपरिषद निवडणुकीमध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर हे काही कामानिमित्त अमेरिकेच्या दौऱ्यावर होते.

धक्कादायक : वीज खंडीत केली जाणार.. मॅसेजवर विश्‍वास ठेवला.. दीड लाखाला चुना लागला

ते विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा होती. मात्र आता क्षितीज ठाकूर हे न्यूयॉर्क वरून मुंबईत परतले आहेत. त्यामुळे ते आता मतदान करणार आहेत. बहुजन विकास आघाडी ची तीन मते नेमकी कोणाला जाणार यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनात दाखल झाले आहेत. ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे आमदारांशी संवाद साधत मत बाद होऊ नये, मत फुटू नये याबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

Eknath Khadse। भाजपात दोन नव्हे तर अनेक समर्थक, मात्र…

नाव मलिक आणि अनिल देशमुख यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

दरम्यान मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यास परवानगी मिळावी यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोन्ही नेत्यांची याचिका यापूर्वी मुंबई हायकोर्टाने निकाली काढत मतदानाची परवानगी नाकारली होती,आता सर्वोच्च न्यायालय मलिक आणि देशमुख यांनी धाव घेतली आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपच्य आजारी आमदार मतदानासाठी मुंबईत दाखल

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघेही आजारी आहेत, राज्यसभा निवडणुकीत दोन्ही आमदारांना ॲम्बुलन्स मधून मतदानासाठी मुंबईत आणण्यात आले होते. आता विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी जगताप आणि टिळक मुंबईकडे रवाना झाले आहेत. या दोन्ही आमदारांनी पक्ष निष्ठेचे अनोखे दर्शन राज्याला घडवले आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी साधला आमदारांशी संवाद

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज सकाळपासूनच सक्रिय आहेत, फडणवीसांनी मतदान कसे करायचे याबाबत आमदारांना मार्गदर्शन केले, मतदान सावकाश करा, घाई गडबड करू नका अशा सूचनाही यावेळी फडणीस यांनी आमदारांना दिल्या.

काँग्रेसच्या नेत्यांनी साधला आमदारांशी संवाद

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळपासून आमदारांना मतदान कसं करायचं याबाबत मार्गदर्शन केलं, तसेच मत फुटू नये, बाद होऊ नये याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या, काँग्रेसच्या दुसर्‍या उमेदवाराला विजयासाठी काही मतांची आवश्यकता आहे, काँग्रेसने या मतांची जुळवाजुळव कशा पद्धतीने केली याचीच उत्सुकता राज्याला लागली आहे.

आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको – उध्दव ठाकरेंचा इशारा

दुपारपर्यंत दीडशे आमदारांचे मतदान

दरम्यान दुपारी बारा वाजेपर्यंत तब्बल दीडशेपेक्षा अधिक आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे त्यानंतर काही तासात निकाल हाती येणार आहेत.