कर्जत जामखेडला मिळणार दुसरा आमदार, उत्सुकता शिगेला, विधानपरिषदेचे मतदान सुरू !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे १० जागांसाठी या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात आहेत. संख्याबळाच्या गणिताचा पेपर कोणता पक्ष अचूक सोडवतो त्याच पक्षाचा उमेदवार विजयी ठरणार आहे. त्यामुळे आज कोणाची बेरीज आणि कुणाची वजाबाकी होणार याचा फैसला होणार आहे. (Karjat Jamkhed will get another MLA in the form of Ram Shinde)

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने राजकीय चमत्कार घडवत आपला उमेदवार निवडून आणला होता, त्याचीच पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीमध्ये होणार असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून होत आहे, तर दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीत बसलेला धक्का विधान परिषद निवडणुकीमध्ये बसू नये याची पुरेपूर काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी – शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानास सकाळीच प्रारंभ झाला दरम्यान मतदानापूर्वी सर्वच पक्षांनी आपल्या  आमदारांतून आपल्या पक्षाच्या आमदारांची मते आपल्याकडेच राहावीत, एकही मत बाद होऊ नये यासाठी निवडणुकीच्या आदल्या दिवसापासून ते हॉटेलातून विधिमंडळातील मतदान केंद्रावर पोहोचेपर्यंत मतदान प्रक्रिया आणि मतांच्या गणितासाठी आमदारांची उजळणी घेतली.

खळबळजनक : अहमदनगर जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल, 10 जिवंंत काडतुसांसह तिघांना बेड्या, एलसीबीची धडक कारवाई

२६ मतांच्या कोट्याचे गणित असले तरी ऐनवेळी गडबड नको म्हणून अधिकचे मत खात्यात ठेवण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जुळवाजुळव सुरूच होती. सर्वच उमेदवार आणि प्रमुख नेते आता पक्ष आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत त्यांची मते आपल्याकडे वळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत होते. आता या मोर्चेबांधणीमध्ये कोणत्या पक्षाला यश येणार याचा फैसला संध्याकाळी होणार आहे.

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार खालील प्रमाणे

शिवसेना – सचिन अहिर, आमश्या पाडवी

काँग्रेस- भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे

भाजप – प्रा राम शिंदे, प्रविण दरेकर, उमाताई खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड

धक्कादायक : वीज खंडीत केली जाणार.. मॅसेजवर विश्‍वास ठेवला.. दीड लाखाला चुना लागला

भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड सामना

भाजपा आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार ९ उमेदवार सहज जिंकू शकतात. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप विरुद्ध भाजपचे प्रसाद लाड यांच्या सामना असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसच्या भाई जगतापांना १० मतांची तर भाजपच्या प्रसाद लाड यांना २० मतांची विजयासाठी आवश्यकता आहे. दोन्ही उमेदवार छोटे पक्ष तसेच अपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको – उध्दव ठाकरेंचा इशारा

विधान परिषदेतील पक्षीय संख्याबळ खालीलप्रमाणे

1) शिवसेनेची मते ५५, उमेदवार २, अतिरिक्त मते ३
2) राष्ट्रवादी मते ५१, उमेदवार २, १ मताची गरज
3) काँग्रेस मते ४४, उमेदवार २, ८ मतांची गरज
4) भाजप मते १०६, उमेदवार ५, २४ मतांची गरज
5) अपक्ष व इतर लहान पक्षांची मते २९

Eknath Khadse। भाजपात दोन नव्हे तर अनेक समर्थक, मात्र…

कर्जत जामखेडला मिळणार दुसरा आमदार

विधानपरिषद निवडणुकीसाठी कर्जत – जामखेडचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा राम शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. आज विधान परिषदेसाठी मतदान होत आहे. राम शिंदे यांच्या रूपाने कर्जत जामखेडला दुसरा आमदार मिळणार का याचीच उत्सुकता मतदारसंघातील जनतेमध्ये शिगेला पोहोचली आहे.

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल कधी लागतो आणि राम शिंदे यांच्या अंगावर कधी गुलाल पडतो याच्या प्रतीक्षेत शिंदे समर्थक आहेत. दरम्यान या निवडणुकीमध्ये राम शिंदे विजयी ठरल्यास ते कर्जत जामखेड मतदारसंघातील दुसरे विधान परिषदेचे आमदार ठरणार आहेत. यापूर्वी प्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे हे विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत.