भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भेट आली चर्चेत, मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांची भेट !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । विधानपरिषद निवडणुकीला ( vidhan parishad election 2022) अवघे दोन दिवस उरले आहे, अशातच राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी (bjp vs mva) असा सामना या निवडणुकीत रंगला आहे. दोन्ही गटाकडून आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असे दावे केले जात आहेत. (BJP and NCP candidates meet for discussion, Eknath Khadse and Ram Shinde meet at Trident Hotel Mumbai)

संख्याबळानुसार दोन्ही गटांना अधिक आमदारांची गरज आहे. त्यामुळे अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांचे आमदार यांना या निवडणुकीत मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या सर्वांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. अश्यातच मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमधून (Trident Hotel, Mumbai) अनपेक्षित राजकीय घडामोड समोर आली.

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP MLA) आपल्या सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये केली आहे. याच हाॅटेलला शनिवारी रात्री माजी मंत्री राम शिंदे (ram shinde) यांनी भेट दिली.

यावेळी शिंदे यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याशी भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो आता समोर आले असून ते सोशल मिडीयावर वायरल होत आहेत.

यंदा होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री राम शिंदे हे उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे उमेदवार आहेत. या दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली. गप्पाही रंगल्या. एकुणच या भेटीमुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.

एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांंच्यात अचानक झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली. या भेटीचा नेमका अर्थ काय यावर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे आखाडे बांधले जात आहेत.