दावा 40 आमदारांंचा पण सुरतच्या हाॅटेलमध्ये किती आमदार ? वाचा यादी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मंत्री एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी बंडखोरी केल्याने मंगळवारी दिवसभर देशाच्या राजकारणात महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा रंगली होती. हा राजकीय भूकंप जरी महाराष्ट्रात झाला असला तरी, याचा केंद्रबिंदू मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील सुरत हे शहर होते.

एकनाथ शिंदेंच्या तावडीतून एक आमदार निसटला, पायी चालत गाठली मुंबई !

सोमवारी विधान परिषदेचे निकाल लागल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी थेट सुरत शहर गाठले आणि मंगळवारी सकाळी शिवसेनेत उभी फूट पडल्याची बातमी समोर आली. शिवसेनेतील अत्यंत निष्ठावंत नेते अशी ओळख असलेल्या मंत्री एकनाथ शिंदे यांनीच बंडाचे निशाण फडकावले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. महाराष्ट्रातील मोठ्या शहरांसह गाव खेड्यातील जनता आणि शिवसैनिकांना शिंदे यांच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला होता.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड का केले ?

शिवसेनेत नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत 12 आमदारांनी सुरतेवर स्वारी केल्याची बातमी सकाळी समोर आली. जसजशी वेळ पुढे जाईल तसतसा आमदारांचा आकडा वाढत गेला,दुपारपर्यंत हाच आकडा 22 आमदारांच्या पुढे गेला, त्यानंतर सायंकाळपर्यंत हा आकडा 30 आमदारांच्या पुढे गेला, रात्री नऊनंतर मात्र आमच्यासोबत चाळीस आमदार आहेत असा दावा शिंदे यांनी केला.

एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीत काय घडलं? तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो

तत्पूर्वी शिवसेनेत नाराज असलेल्या एकनाथ शिंदे सह इतर आमदारांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील इतर नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे सुरतला दाखल झाले होते, मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तासभर त्यांच्याशी चर्चा केली, त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिंदे यांची दूरध्वनीवरून चर्चा घडवून आणली, मात्र काहीच तोडगा निघाला नाही.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया

तर दुसरीकडे सुरतमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची बाडदास्त मंगलप्रभात लोढा आणि गुजरातचे भाजपचे मंत्री हे करत होते, ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे आमदार थांबले होते, त्या हॉटेलला गुजरात सरकारने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शिवसेनेच्या आमदारांना गांधीनगरला हलवण्याची तयारी भाजपने पुर्ण केली होती, मात्र यामध्ये अचानक बदल करून आता या आमदारांना आसाममधील गुवाहटीला घेऊन जाणार असल्याचे रात्री उशिरा समोर आले.

महाविकास आघाडी सरकार पडणार का ? शरद पवार काय म्हणाले ?

दरम्यान एकदा शिंदे गटाकडून आमच्या सोबत 40 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे, मात्र सुरतमधील त्या हॉटेलमध्ये किती आमदार आहेत? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरतमधील मेरिडेयन हॉटेलमध्ये 33 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे.

सुरतमधील मेरिडेयन हॉटेलमध्ये असलेले 33 आमदार खालीलप्रमाणे

1 महेंद्र थोरवे
2 भरत गोगावले
3 महेंद्र दळवी
4 अनिल बाबर
5 महेश शिंदे
6 शहाजी पाटील
7 शंभूराज देसाई
8 बालाजी कल्याणकर
9 ज्ञानराजे चौघुले
10 रमेश बोरणारे
11 तानाजी सावंत
12 संदिपान भुमरे
13 अब्दुल सत्तार
14 नितीन देशमुख
15 प्रकाश सुर्वे
16 किशोर पाटील
17 सुहास कांदे
18 संजय शिरसाट
19 प्रदीप जयस्वाल
20 संजय रायमुलकर
21 संजय गायकवाड
22 एकनाथ शिंदे
23 विश्वनाथ भोईर
24 राजकुमार पटेल
25 शांताराम मोरे
26 श्रीनिवास वनगा
27 प्रताप सरनाईक
28 प्रकाश अबिटकर
29 चिमणराव पाटील
30 नरेंद्र बोंडेकर
31 लता सोनावणे
32 यामिनी जाधव
33 बालाजी किनीकर