एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासमवेत 35 आमदार असल्याची माहिती समोर येत असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र पाठक सुरत दाखल होऊन एकनाथ शिंदेसोबत चर्चा करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे.

दरम्यान शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की आम्ही जोडणारे लोक आहोत, तोडणारे नाही असे सूचक वक्तव्य केले आहे.

आमदार राम शिंदे उद्या कर्जत – जामखेडमध्ये होणार दाखल, असा असेल दौरा

दरम्यान आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या बंडखोरीमुळे मोठा भूकंप झाला आहे, शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह सूरत गाठली आहे. एकुणच सर्व राजकीय घडामोडी पाहता भाजपने ऑपरेशन लोटस अतिशय वेगाने हाती घेतल्याचे दिवसभरातील वेगवान राजकीय घडामोडींमुळे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडी सरकार पडणार का ? शरद पवार काय म्हणाले ?

विधान परिषद निकालानंतर प्रतिक्रिया देताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस म्हणाले होते की, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही, म्हणून आमच्या पाचव्या उमेदवाराला सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मदत केली, आमचे नेते नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे हेच यातून स्पष्ट होत आहे, यापुढेही आमचा संघर्ष महाविकास आघाडीशी सुरू राहील, लोकाभिमुख सरकार आल्यानंतरच आमचा संघर्ष थांबेल.

आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, बंडखोर आमदारांचा उध्दव ठाकरेंना फोन, राजकीय घडामोडींना वेग

फडणीस यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री एकनाथ खडसे हे रात्रीतून आपल्या समर्थकांसह सुरतमध्ये दाखल झाले होते ही बातमी आता काही समोर आल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती.

एकूणच या सर्व घडामोडी वर बोलताना रोहित पवार म्हणाले की, मला सुद्धा बातम्यातुनच शिवसेनेच्या बंडखोरी माहिती मिळाली. मी देखील हे बातम्यातुनच पाहत आहे. एकनाथ शिंदे सर्वांसमोर आल्यानंतरच ते आपली भूमिका मांडतील, आम्ही जोडणारे लोक आहोत, काहीजण तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, बघूया काय होतेय ते अशी भूमिका यावेळी आमदार रोहित पवार यांनी मांडली.

BJP Operation Lotus गतिमान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गांधीनगरला हलवले जाणार, तीन चार्टर विमान,14 फॉर्च्युनर सज्ज !

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, राज्यात वारीचे भक्तिमय वातावरण आहे, अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मात्र आज आळंदीच्या दौऱ्यावर होते त्यांनी या दौऱ्यात संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेतले.

Rohit Pawar's big reaction on Eknath Shinde's rebellion