एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीत काय घडलं? तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Eknath Shinde Milind Narvekar Meeting: शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.राज्यसभेत शिवसेनेचा आणि विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करत भाजपाने आपले सर्व उमेदवार निवडून आणले. या धक्क्यातून महाविकास आघाडी सावरत नाही तोच एकनाथ शिंदे यांनी सुमारे ३ ०पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत गुजरात गाठलं आणि बंडाचं निशाण फडकवलं.

शिवसेनेत मिळणारी सापत्न वागणूक आणि महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचा असलेला वरचष्मा यावर नाराज असल्याने शिंदे यांनी हे बंड पुकारल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ऑफर घेऊन शिवसेनेचे दोन खास नेते सुरत मध्ये एकनाथ शिंदेंना भेटायला गेले. त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांना भेटीसाठी एकनाथ शिंदे यांनी तब्बल तासभर ताटकळवले असं दिसून आले.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे कालच सुरतमध्ये दाखल झाले. त्यानंतर ते सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलमध्ये आहेत. तेथे त्यांच्यासोबत सुरूवातील १०-१२ आमदार होते, मात्र आता त्यांच्यासोबत सुमारे ३५ आमदार असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी एकनाथ शिंदे यांची नाराजी शमवण्यासाठी आणि त्यांना पुन्हा आणण्यासाठी मिलिंद नार्वेकर शिवसेनेकडून प्रस्ताव घेऊन चर्चेला सुरतला गेले होते.

त्यावेळी मिलिंद नार्वेकर यांना तब्बल तासभर बाहेरच वाट पाहावी लागली. सुरूवातीला मिलिंद नार्वेकर यांची कार सुरक्षाकडे असलेल्या गेटवर तब्बल १० मिनिटं अडवण्यात आली. काही वेळाने त्यांना आतमध्ये सोडण्यात आले. पण त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्याशी भेट घडण्यासाठी त्यांना ४५ मिनिटं ताटकळावं लागलं.

आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, बंडखोर आमदारांचा उध्दव ठाकरेंना फोन, राजकीय घडामोडींना वेग

मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि अतिशय विश्वासू असे सहकारी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाला भेटावे, किती काळ वेळ द्यावा याबद्दलचा सल्ला नार्वेकर उद्धव यांना देतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ जी व्यक्ती इतरांना देते त्याच व्यक्तीला दुसऱ्या एका सहकाऱ्याला भेटण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागल्याने राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसून आले.

दरम्यान, भाजपाचे आमदार संजय कुटे दोन तास आधीच सूरतला पोहोचले होते. त्यांनी शिंदेंची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनाही पोलिसांनी हॉटेल पासून १०० मीटर अंतरावर अडविले होते. यानंतर फोनाफोनी झाल्यावर त्यांना आत सोडले होते. मिलिंद नार्वेकरांच्या देखील एकाच गाडीला आतमध्ये जाऊ देण्यात आले. अन्य चार गाड्या बाहेर ठेवण्यात आल्या. नार्वेकर पोलिसांना हाताने बाजुला होण्यास सांगत होते. अखेर पोलिसांनी नार्वेकरांचीच गाडी आत सोडली.

महाविकास आघाडी सरकार पडणार का ? शरद पवार काय म्हणाले ?

एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीत काय घडलं

यावेळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून १५ मिनिटे संवाद झाला. नार्वेकरांच्या फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले.या संवादात एकनाथ शिंदे यांनी तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो असं संतापून म्हणाले.एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढलं असं का केले? असा सवाल केला.

मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सत्तेसाठी कधीही…

तसेच या संवादात एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढलं का? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतायेत. भूमिका मांडायची मग मुंबईत या असं बोलतायेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळं का बोलतायेत असा सवाल त्यांनी केला.

त्याचसोबत हिंदुत्वाच्या आधारे शिवसेना-भाजपा युती व्हावी हा आपला मुद्दा आहे. मी कुठलाही पक्षविरोधी कारवाई केली नाही तरी गटनेते पदावरून काढलं. काही नेते माझ्याशी फोनवर बोलतायेत. पण प्रसारमाध्यमांशी वेगळा संवाद का? शिवसेनेचे नेते माझ्याशी चर्चा करायला येत असतील तर इतर नेत्यांना याची कल्पना नाही का? जवळपास १५ मिनिटे हा संवाद झाला. लवकरच आपली भूमिका जाहीर करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतर मिलिंद नार्वेकर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ गुजरातच्या सूरत हॉटेलला गेले होते. गटनेतेपदावरून काढल्याबाबत तीव्र नाराजी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. हिंदुत्वाच्या भूमिकेवरून शिवसेना-भाजपा यांच्यात युती व्हावी मग माझं चुकलं काय? मी पक्षहिताच्याविरोधात बोललो नाही. कुठलाही गट स्थापन केला नाही मग कारवाई का केली हा मुद्दा उपस्थित केला आहे.