जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्याचे वादळात राज्यावर घोंंघावात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सकाळपासूनच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अशातच महाविकास आघाडी सरकारचे निर्माते शरद पवार यांची यासर्व घडामोडींवर प्रतिक्रिया समोर आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !
शिवसेनेत बंडाळी उफाळून आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे.अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे भविष्य काय?, विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा झालेला पराभव, शिवसेनेची बंडाळी या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे.
BJP Operation Lotus गतिमान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गांधीनगरला हलवले जाणार, तीन चार्टर विमान,14 फॉर्च्युनर सज्ज !
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यायचं ठरलं तर तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, सरकार स्थापन होण्यापूर्वी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे.मुख्यमंत्रीपदी शिवसेनेकडे आहे, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर महत्त्वाचे खाते काँग्रेसकडे आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सत्तेसाठी कधीही…
आता शिवसेना निर्णय ठरवावं मुख्यमंत्री कोणाला करायचं असे सांगत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारचे काम चांगलं सुरू आहे, मंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड हे शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, त्यांच्या बद्दल काय निर्णय घ्यायचा आहे शिवसेना ठरवेल असेही पवार यांनी स्पष्ट केले.
मंत्री एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय | Shiv Sena’s big decision regarding Minister Eknath Shinde
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे समस्या निर्माण झाले आहे मात्र या पेचातून आम्ही काही ना काही मार्ग काढू त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडी सरकारला कुठलाच धोका वाटत नाही असे पवार म्हणाले.
आमदार राम शिंदे उद्या कर्जत – जामखेडमध्ये होणार दाखल, असा असेल दौरा
महाविकास आघाडी सरकार जर पडलं तर राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, आम्ही कदापी भाजपसोबत जाणार नाहीच प्रसंगी विरोधात बसू,महाविकास आघाडी कुठलेही मतभेद नाहीत असेही पवारांनी स्पष्ट केले.