एकनाथ शिंदेंच्या तावडीतून एक आमदार निसटला, पायी चालत गाठली मुंबई !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी बंड पुकारलं आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. शिंदे यांना जवळपास 35 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला जातोय.

शिंदे सध्या आपल्या समर्थक आमदारांसह सूरतमधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबले आहेत. शिवसेनेच्या एवढ्या आमदारांनी थेट पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जावून अशाप्रकारचं धाडस केल्याने राज्यभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड का केले ?

या दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये गेलेले शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटातून निसटले आहेत. त्यानंतर त्यांनी काल रात्री नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या याबाबत माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीत काय घडलं? तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो

शिवसेनेच्या आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले होते. पण त्या गटातून ते मोठ्या शिताफीने निसटले. विधान परिषदेच्या निकालानंतर काल साहेबांनी ठाण्यात एकेठिकाणी जेवणासाठी बोलावलं असं सांगण्यात आलं होतं. पण साहेब कोणते ते स्पष्ट करण्यात आलं नव्हतं.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर रोहित पवार यांची मोठी प्रतिक्रिया

कैलास पाटील हे ठाण्याहून गुजरातला निघालेल्या गाडीमध्ये बसले होते. पण त्यांना प्रवासादरम्यान संशय आला. त्यानंतर त्यांना सगळा कट समजला. मुंबईपासून जवळपास 40 ते 50 किमी लांब गाडी गेल्यानंतर कैलास पाटील यांनी लघूशंकेचा बहाणा केला.तोपर्यंत गाडी ही मुंबईपासून 100 किमी पेक्षाही जास्त लांब गेली होती.

महाविकास आघाडी सरकार पडणार का ? शरद पवार काय म्हणाले ?

कैलास पाटील हे लघुशंकेच्या नावाने गाडीतून बाहेर पडले त्यानंतर ते पळत जावून तिथून निसटले. भर पावसात सलग चार ते पाच तास पायी चालल्यानंतर त्यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर ते एका ट्रॅक्टरच्या मदतीने दहीसरपर्यंत आले.

मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सत्तेसाठी कधीही…

सर्व घटनाक्रमानंतर कैलास पाटील ‘मातोश्री’वर दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संबंधित प्रकाराची माहिती दिली. ते आज दिवसभरापासून ‘वर्षा’ बंगल्यावर आहेत. ते शिवसेनेच्या आजच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी झाले होते.