मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सत्तेसाठी कधीही…

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकावले आहे. सकाळपासून राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिंदे आपल्या समर्थकांसह गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 पेक्षा अधिक आमदार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला प्रस्ताव ठाकरे यांनी धुडकावल्याचे समोर येत आहे. शिवसेनेने शिंदे यांना गटनेते पदावरून हटववण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय | Shiv Sena’s big decision regarding Minister Eknath Shinde

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय नाराजीला नाट्याचे शिल्पकार एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. शिंदे यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. दरम्यान भाजपने हाती घेतलेल्या ऑपरेशन लोटस या मोहिमेची जबाबदारी भाजपकडून भूपेंदर यादव आणि मंगल प्रभात लोढा यांच्याकडे आहे. हे दोन नेते ऑपरेशन लोटस हँण्डल करत आहेत.

मोठी बातमी : करुणा शर्मांना पुण्यात अटक

मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार सुरतमधील ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्या हॉटेलमधील स्टाफच्या हातात सुद्धा मोबाईल अलाउड केले जात नाहीयेत, अशीसुद्धा माहिती आता समोर आले आहे. तसेच गुजरात सरकार मधले काही मंत्री सुद्धा सुरतच्या अभियानावर नियुक्त करण्यात आले आहेत.

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते समर्थक आमदार कोण ? वाचा आमदारांंची यादी

मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार सुरत मधील ज्या हॉटेलमध्ये थांबून दे आहेत, त्या हॉटेलच्या भोवती गुजरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. वरिष्ठ आयएएस आयपीएस अधिकारी या ठिकाणी वावरताना दिसत आहेत.यामुळे भाजपने शिंदे यांना गळाला लावून शिवसेनेला मोठा धक्का दिल्याचे आता बोलले जात आहे.

महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शाह पोहोचलेदेवेंद्र फडणवीसही दिल्लीत, ते ही या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता.