अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एकीकडे राज्यात शिवसेनेचे मंत्री  आणि आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने राज्याच्या राजकारणात मोठ भूंकप झाला आहे. तर  दुसरीकडे अमदनगर जिल्ह्याही राजकीय भूकंपाने हादरला आहे. या राजकीय भूकंपामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. ( Political earthquake in Ahmednagar district, many BJP leaders join NCP )

राष्ट्रवादीने अहमदनगर जिल्ह्यात भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केल. यासंदर्भातील ट्विट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज केले आहे.राष्ट्रवादीच्या धक्कातंत्रामुळे भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार राम शिंदे उद्या कर्जत – जामखेडमध्ये होणार दाखल, असा असेल दौरा

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दोन तासापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील भाजपचे नेते तथा माजी जि.प. अर्थ व बांधकाम सभापती कैलासराव वाघचौरे,

मोठी बातमी : करुणा शर्मांना पुण्यात अटक

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकर, नगर तालुक्यातील माजी जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला या सर्व कार्यशील नेत्यांचे मी पक्षात मनापासून स्वागत करतो. आपल्या हस्ते समाजासाठी भरीव कार्य होवोत ही सदिच्छा असे ट्विट केले आहे.

राज्यात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी बंद केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, आजच्याच दिवशी राष्ट्रवादीने भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या आपल्या पक्षात प्रवेश देत अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

राम शिंदेंच्या विजयानंतर चोंडीत गावकऱ्यांचा विजयी जल्लोष

दरम्यान या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,राष्ट्रवादीचे नेते घनश्याम आण्णा शेलार,आमदार किरण लहामटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, प्रकाशराव नाईकवाडे उपस्थित होते.