आम्हाला सुरतमधून बाहेर काढा, बंडखोर आमदारांचा उध्दव ठाकरेंना फोन, राजकीय घडामोडींना वेग

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदारांनी आम्हाला सुरत मधून बाहेर काढा, असा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती आता समोर येत आहे, यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेत नाराज असलेल्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावले असून, आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर मंत्री शिंदे हे बारा आमदारांसहीत सुरतला गेल्याची बातमी आज सकाळी समोर आली होती.

महाविकास आघाडी सरकार पडणार का ? शरद पवार काय म्हणाले ?

त्यानंतर दुपारी शिंदे यांच्यासोबत 20 पेक्षा अधिक आमदार असल्याचे बोलले जात होते, मात्र सायंकाळपर्यंत शिंदे यांच्या सोबत 35 आमदार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

दरम्यान मंत्री शिंदे यांच्यासोबत असलेल्या एका आमदाराा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी बातमी समोर आली होती. त्यातच काही आमदारांच्या कुटुंबीयांनी आमदारांचे अपहरण झाल्याची तक्रार पक्षाकडे केली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सत्तेसाठी कधीही…

तर काहींनी पोलिसात धाव घेतली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे.असे राज्याच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मंत्री एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय | Shiv Sena’s big decision regarding Minister Eknath Shinde

दरम्यान दिवसभरातील वेगवान राजकीय घडामोडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे गटातील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करून आम्हाला सुरतमधून बाहेर काढा अशी विनंती केल्याची बातमी आता समोर आली आहे  यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही नाईन मराठीने दिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की राज्यातील नो आमदारांच्या कुटुंबियांनी आमच्याकडे आमदारांच्या अपहरणाची तक्रार केली आहे. हे असंच सुरु राहिलं तर मुंबई पोलिसांना कठोर ऍक्शन घ्यावी लागेल असे राऊत म्हणाले.