BJP Operation Lotus गतिमान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना गांधीनगरला हलवले जाणार, तीन चार्टर विमान,14 फॉर्च्युनर सज्ज !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : शिवसेनेचे दिग्गज नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. भाजपने हाती घेतलेल्या ऑपरेशन लोटस ( bjp Operation Lotus) या मोहिमेला मंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी साथ दिल्याने राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला.

मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार हे विधानपरिषद निकालानंतर गुजरातमधील सुरत शहरातील एका हॉटेलला रातोरात जाऊन थांबले आहेत. त्यांच्यासोबत पंचवीसच्या आसपास आमदार असल्याचा दावा केला जात आहे. सकाळपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेने कठोर निर्णय घेत शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही सत्तेसाठी कधीही…

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र पाठक हे शिवसेना नेते सुरतमध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेत असलेल्या आमदार बरोबर ते चर्चा करू शकता अशी माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे सुरतमध्ये असलेले शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना संध्याकाळी गांधीनगरला हलवण्याच्या जोरदार हालचाली भाजपकडून सुरू झाल्या आहेत.

मंत्री एकनाथ शिंदेंबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय | Shiv Sena’s big decision regarding Minister Eknath Shinde

दरम्यान मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत असलेल्या आमदारांना सुरतवरून अहमदाबादला नेण्याची तयारी सुरुवातीला करण्यात आली होती, परंतु आता यात बदल करण्यात आला असून,सर्वांना आज सायंकाळी गांधीनगरला हलवण्याची तयारी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राजकीय भूकंप, भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !

गृहमंत्री अमित शहा,भाजपचे अध्यक्ष जेपी नाडा आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, त्यानंतरच भाजप पुढील रणनिती ठरणार आहे.

आमदार राम शिंदे उद्या कर्जत – जामखेडमध्ये होणार दाखल, असा असेल दौरा

दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी आमदारांना सुरत येथून गांधीनगरला नेण्यासाठी सुरतमध्ये तीन चार्टर विमान, 14 फॉर्च्युनर गाड्या, तैनात करण्यात आल्या आहेत, आज सायंकाळी सात वाजता या सर्व आमदारांना गांधीनगरला नेले जाणार आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही नाईन मराठीने दिले आहे. (Operation Lotus speeding, Shiv Sena rebel MLAs to be shifted to Gandhinagar, three charter planes, 14 Fortuners ready, )

मोठी बातमी : करुणा शर्मांना पुण्यात अटक