ठरलं ! भारतात इंटरनेट सेवा सुपर फास्ट होणार, इंडिया मोबाईल काँग्रेस तंत्रज्ञान प्रदर्शनातून होणार भारतात 5G internet service चा शुभारंभ !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भारतात 5G इंटरनेट सेवा कधी सुरू होणार याची संपूर्ण देशवासियांना प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून ऑक्टोबर महिन्यापासून भारतात इंटरनेट सेवा सुपर फास्ट होणार आहे. याबाबतची घोषणा 1 ऑक्टोबरच्या इंडिया मोबाईल काँग्रेस (india Mobile Congress technology exhibition 2022) या तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

Yes Internet service will be super fast in India, 1 October 2022 5G internet service will be launched in India, india Mobile Congress technology exhibition 2022, PM Narendra Modi,

1 ऑक्टोबर 2022 रोजी आशिया खंडातील सर्वात मोठे इंडिया मोबाईल काँग्रेस (IMC2022) तंत्रज्ञान प्रदर्शन प्रगती मैदानात भरणार आहे. या प्रदर्शनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ करणार आहेत. या सेवेमुळे भारतात इंटरनेट सुसाट धावणार आहे. याचा मोठा फायदा भारतीयांना होणार आहे. या सेवेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. तज्ञांच्या मते, 2023 ते 2040 या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेला 455 अब्ज डॉलरचा फायदा होऊ शकतो.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने यासंदर्भात ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचा शुभारंभ होईल. ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ या आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनात या योजनेचा शुभारंभ होईल.’

भारत सरकारने अल्पावधीत देशात 5G इंटरनेट सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचं लक्ष्य ठेवल्याचं, केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होतं. तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. 12 ऑक्टोबर पासून भारतात 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे.