Raj thackeray Amit Shah latest news : मागील लोकसभा निवडणुकीत भाजपा विरोधात प्रचाराची राळ उठवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे इंजिन महायुतीच्या (NDA) ट्रॅकवर आले आहे. दिल्ली दौर्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी आज भाजपा नेते अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली.दोन्ही नेत्यांमध्ये सुरु असलेली ही बैठक संपली आहे.राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे हेही शहा यांच्या भेटीसाठी गेले होते. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये काय निर्णय झाला याची सर्वांनाच उत्सुकता आहे. (MNS Join NDA)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, या बैठकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत मनसे सोबत आपली युती मजबूत करण्याचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. यावरून राज ठाकरे हे महायुतीचे अर्थात एनडीएचे घटक होतील असे बोलले जात होते. लोकसभा निवडणूक जाहीर होताच या चर्चांना अधिकच उधाण आले आहे. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नवी दिल्लीमध्ये पोहोचले आहे.
राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महायुतीत (NDA) मनसेच्या समावेश करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा पार पडली. मनसे हा जवळपास एनडीएचा घटक पक्ष बदल्यात जमा आहे, परंतू अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. या अमित शहा आणि राज ठाकरे यांच्या बैठकीतला सविस्तर तपशिल अद्याप बाहेर आलेला नाही.
या बैठकीआधी भाजपा नेते विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर तावडे यांनी राज ठाकरेंना सोबत घेत अमित शहा यांचे निवासस्थान गाठले. त्यानंतर ठाकरे आणि शहा यांची बैठक पार पडली. दोन्ही नेत्यांमधील ही बैठक संपली आहे. अमित शहा यांच्या भेटीवेळी राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हे उपस्थित होते.
महायुती आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खुद्द राज ठाकरे हे सोमवारी रात्री दिल्लीत पोहोचले आहे. रात्री कोणत्याही नेत्याची भेट होऊ शकली नाही. भाजप सरचिटणीस विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहे. विनोद तावडे आणि राज ठाकरे हे एकत्रितपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. मनसेचा एनडीएमध्ये समावेश करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेले असून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक सुरु आहे. राज्यातील महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहभागी व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई हा लोकसभा मतदारसंघ मनसेसाठी सोडावा, अशी राज ठाकरे यांची मागणी असून सोबतच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सन्मान जनक जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मनसे आणि भाजप युतीबाबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर मनसेला लोकसभेसाठी दोन जागा द्याव्यात, असा प्रस्ताव मांडला. बंद दाराआड झालेल्या या चर्चेचा नेमका तपशील अद्याप बाहेर आला नसला तरी लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि मनसे (MNS) एकत्र येणार, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.
राज ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी अमित ठाकरे यांना घेऊन अचानकपणे चार्टर्ड विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपानंतर राज ठाकरे दिल्लीकडे रवाना झाले असे सांगितले जात होते. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या या भेटीसाठी फार पूर्वीपासूनच हालचाली सुरु होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात लोकसभेत युती करण्याच्यादृष्टीने मुंबईत तीनवेळा बैठक झाली होती. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी अमित शाह यांना एकांतात भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही बाब देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या कानावर घातली होती. त्यानुसार राज ठाकरे यांना अमित शाह यांनी दिल्लीला बोलावून घेतले आणि ठरल्यानुसार या दोघांची ‘वन टू वन’ भेट झाली.
दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद पार पडली आहे. ‘राज ठाकरे दिल्लीत का गेले हे काही तासांत स्पष्ट होईल, ते जो निर्णय घेतील तो राज्याच्या हिताचा असेल. राज ठाकरे हिंदुत्व आणि पक्षाच्या भल्याचा निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आणि त्यांच्या आदेशानं आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय ही वस्तूस्थिती आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
नांदगावकरांना मिळणार तिकीट?
दरम्यान, जर मनसे आणि भाजप युती झाली तर मनसेकडून लोकसभेचं तिकीट कोणाला दिलं जाऊ शकतं याबाबत देखील संदीप देशपांडे यांनी संकेत दिले आहेत. बाळा नांदगावकर खासदार झाले तर आम्हाला आनंदच होईल, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
2019 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात जोरदार प्रचार केला होता. आता 2024 च्या निवडणुकीत तेच राज ठाकरे महायुतीच्या (एनडीए) ट्रॅकवर स्वार होऊन आपले रेल्वे इंजिन सत्तेच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी दिल्लीवारी आहेत. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.