खुशखबर : पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी कपात,भारतात ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त झाले पेट्रोल- डिझेल, ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा !

petrol diesel price cut news : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील जनतेला महागाईतून दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात केली आहे. सार्वजनिक इंधन कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात दोन रूपयांनी कपात केली आहे.शुक्रवारी 15 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून संपुर्ण देशात पेट्रोल- डिझेल 2 रूपयांनी स्वस्त होणार आहे. इंधन दरकपात झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

petrol diesel price cut news, Good news, Big reduction in  price of petrol and diesel, petrol-diesel has become cheaper by two rupees in India, big relief for consumers,

सार्वजनिक कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधन दरांचा आढावा घेऊन नियमितपणे देशातील इंधन दरांमध्ये बदल करतात. मात्र, त्या प्रक्रियेत जवळपास दोन वर्षे खंड पडला होता. आता सार्वजनिक कंपन्यांनी दर कपात केल्याने देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रूपयांना आणि डीझेल ८७.६२ रूपयांना उपलब्ध होईल.

दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी इंधन स्वस्त होण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. कोट्यवधी भारतीयांचा समावेश असलेल्या आपल्या परिवाराचे हित आणि सुविधा हेच आपले सदैव लक्ष्य असल्याचे यशस्वी पंतप्रधानांनी पुन्हा सिद्ध केले, असे त्यांनी म्हटले आहे.