धक्कादायक : दिड वर्षांपासून कुटुंब राहत होतं मृतदेहासोबत, मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस !

उत्तर प्रदेश : कोरोना काळामध्ये गंगेत मृतदेह वाहत असल्याचे समोर आले होते. आता याच यूपीतील कानपूर शहरातून मन हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांनी जपून ठेवल्याचे उघडकीस आले आहे.गेल्या दीड वर्षापासून पार्थिव देहासोबत कुटुंब राहत होते.मृतदेहाची ममी झाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे.

Shocking incident in Kanpur, Uttar Pradesh, Body of man kept by his family at home for over one and half years, dead body was mummification, the income tax officer Vimlesh Kumar died of corona,

रावतपूरच्या कृष्णापुरी भागात राहणारे आयकर अधिकारी विमलेश सोनकर यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान 22 एप्रिल 2021 रोजी मृत्यू झाला होता. रुग्णालयाने त्यांचे मृत्यूपत्र कुटुंबियांकडे सोपवले होते. परंतु विमलेश यांचा मृत्यू झाला नसून ते कोमात असल्याचे कुटुंबियांना वाटत होते. त्यामुळे रुग्णालयाने मृत्युपत्र दिल्यानंतरही विमलेश यांचा मृतदेह कुटुंबियांनी जपून ठेवला. शुक्रवारी आयकर विभागाचे अधिकारी त्यांचा शोध घेत घरी पोहोचले तेव्हा त्यांना धक्काच बसला. विमलेश यांचा मृतदेह अक्षरश: ममीसारखा झाला होता.

विमलेश सोनकर हे अहमदाबाद येथील आयकर विभागात असिस्टंट पदावर कार्यरत होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अहमदाबादहून लखनौमध्ये हलवण्यात आले. तिथेही तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुन्हा कानपूरले नेण्यात आले. येथील मोती नर्सिंग होममध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 22 एप्रिल 2021 रोजी त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने मृत्युपत्र आणि मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला.

23 एप्रिल रोजी सोनकर कुटुंबिय विमलेश यांचा मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी निघाले तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये हालचाल दिसली. हाताला ऑक्सिमीटर लावले तेव्हा पल्स रेट आणि ऑक्सिजन लेव्हलही दिसली. त्यामुळे कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय रद्द केला आणि विमलेश यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाही रुग्णालयाने त्यांची म्हणणे ऐकून घेतले नाही आणि नकार दिला. त्यामुळे कुटुंबियांनी विमलेश यांना घरी नेण्याचा निर्णय घेतला.

विमलेश हे कोमात असल्याचे मानत दिवस-रात्र कुटुंबिय त्यांची सेवा करू लागले. सकाळ-संध्याकाळ विमलेश यांचे शरीर डेटॉलने धुण्यात येऊ लागले, तेलाने मालिश सुरू झाली. तसेच रोज त्यांचे कपडेही बदलण्यात येऊ लागले. त्यांना ठेवण्यात आलेल्या रुमचा एसीही 24 तास सुरू ठेवण्यात आला. हा प्रकार दीड वर्ष सुरू होता. मात्र हा प्रकार उघडकीस येताच ॲडिशनल सीएमओ डॉ. गौतम हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कुटुंबियांनी विश्वासात घेत विमलेश जिवंत असतील तर त्यांना रुग्णालयात दाखल करू असे सांगितले. परंतु तपासादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मृतदेह सडायला सुरुवात होते तेव्हा शरीरातील पाणी बाहेर येऊ लागते. त्यामुळे दुर्गंधी येते. परंतु विमलेश यांचा मृतदेह पाणी बाहेर टाकू लागला तेव्हा कुटुंबिय डेटॉलने साफ करू लागले. तसेच तेलाची मालिशही रोज सुरू होती. त्यामुळे मृतदेह सडला नाही आणि तो ममीसारखा दिसू लागला.