गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने यांचा सत्कार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । प्रा कैलास माने यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जामखेड तालूका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रा कैलास माने यांची आज जामखेडला भेट घेतली आणि त्यांचा निवडीबद्दल सत्कार केला.

Shiv Sena taluka chief Prof. Kailas Mane felicitated on behalf of Gaffarbhai Pathan

प्रा कैलास माने यांची नुकतीच शिवसेनच्या (शिंदे गट) जामखेड तालुका प्रमुखपदी निवड झाली आहे. माने यांचा तालुक्यात ठिकठिकाणी सत्कार होत आहे. माने यांच्या रूपाने जामखेड तालुक्यात शिंदे गटाला मोठे बळ मिळाले आहे. जामखेड तालुक्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी माने यांना मोठी रणनिती आखावी लागणार आहे.

दरम्यान प्रा कैलास माने यांची शिवसेना तालुका प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी प्रा कैैलास माने यांचा सत्कार करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुकुंद आप्पा कडू, सुखदेव शिकारे, बाबासाहेब माने, प्रकाश मोरे, दादा राऊत, गोरख मुंगळे, कल्याण कवादे पाटील, आर्शद पठाण, सुभाष सोनटक्के सह आदी उपस्थित होते. गफ्फारभाई पठाण हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. सर्व राजकीय पक्षात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.