- हायलाईट्स
- भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना
- दिवस तिसरा
- इंग्लंडचा पहिला डाव अटोपला
- इंग्लंडने केल्या 319 धावा
- मोहम्मद सिराजने घेतले चार बळी
- बेन डकेटने झळकावले दीडशतक
- भारताकडे 126 धावांची आघाडी
- भारताचा दुसरा डाव सुरु
Ind vs Eng 3rd Test 2024 : गुजरातच्या राजकोटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. भारताच्या 445 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या डावांत 319 धावा केल्या.इंग्लंडकडून बेन डकेटने दीडशतक झळकावले तो 153 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर इंग्लंड एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारून शकला नाही.
भारताने पहिल्या डावांत रोहित शर्मा, रविंद्र जडेजा यांची शतके आणि सर्फराज खानचे अर्धशतक व ध्रुव जुरेलच्या महत्वपूर्ण 46 धावा केल्या होत्या. त्याबळावर भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या.
कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुपार नंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. 89 धावांवर जॅक क्राॅली हा आश्विनचा शिकार ठरला. त्याने 15 धावा केल्या.जॅक क्राॅली हा आश्विनचा पाचशेवा बळी ठरला. जॅक क्राॅली आऊट झाल्यानंतर ओलिस पोप मैदानावर आला. त्याने बेन डकेटच्या साथीने 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.ही जोडी भारतीय संघासाठी धोकादायक ठरू पाहत असतानाच मोहम्मद सिराजने ओलिस पोप ला पायचीत आऊट करत माघारी धाडले. दुसर्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बेन डकेट 133 धावांवर तर जो रूट हा 9 धावांवर नाबाद होता.
तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर भारताचा आघाडीच गोलंदाज मोहम्मद सिराज याने भेदक मारा करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्याने चार विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा नाबाद शतकवीर बेन डकेट तिसऱ्या दिवशी मोठी धाव संख्या उभारू शकला नाही. तो 153 धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. बेन डकेट नंतर बेन स्टोक्स थोडी झुंज दिली तो 41 धावांवर बाद झाला.
इंग्लंड विरूध्द भारत कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज हा तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला. त्याने 4 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजा 2, कुलदीप यादव 2, बुमराह 1, आश्विन 1