UPSC Civil Service Exam 2022 | UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी

UPSC Civil Service Exam 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी UPSC कडून आज नागरी सेवा परीक्षा (प्रिलिम्स) – 2022 ची अधिसूचना जारी करण्यात आली .या परीक्षांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 फेब्रुवारी 2022 असणार आहे. (upsc exam 2022 application date)

IAS, IPS, IRS, IFS पदांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून देशपातळीवर नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांसाठी देशातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी प्रिलिम्स परीक्षेचे नोटिफिकेशन आज जारी झाले. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 22 फेब्रुवारी 2022 असणार आहे. (UPSC Civil Service Exam 2022)

अर्ज भरण्यासाठी www.upsc.gov.in किंवा www.upsconline.nic.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

UPSC च्या या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यासह सर्व भारतीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाईल.

भारतीय वनसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत बसण्यासाठी, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजेच दोन्ही स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षा सामायिक असतील. नागरी सेवा पूर्व परीक्षा ५ जून २०२२ रोजी होणार आहे.

पात्रता:

  1. मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी.
  2. बॅचलर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत बसलेले विद्यार्थी अर्ज भरू शकतात.
  3. अशा उमेदवारांना नागरी सेवा (मुख्य परीक्षा) चा फॉर्म भरताना बॅचलर पदवी प्राप्त केल्याचा पुरावा द्यावा लागेल.

वय श्रेणी

  1. किमान वय – 21 वर्षे. कमाल वय 32 वर्षांपेक्षा कमी असावे.
  2. उच्च वयोमर्यादा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्षे,
  3. एससी/एसटीसाठी पाच वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहा वर्षे शिथिल आहे.

कॅलेंडरनुसार महत्त्वाच्या तारखा (upsc exam 2022 calendar)

  1. UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 (प्रिलिम्स) अधिसूचना प्रकाशन तारीख – 2 फेब्रुवारी 2022
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2022
  3. प्रिलिम्स परीक्षेची तारीख – 5 जून 2022
  4. मुख्य परीक्षेची तारीख – 16 सप्टेंबर 2022

गेल्या वर्षी अर्जाची फी 100 रुपये होती.

निवड – प्रिलिम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), रेल्वे गट A (भारतीय रेल्वे खाते सेवा), भारतीय पोस्टल सेवा, भारतीय पोस्टल सेवा, भारतीय व्यापार सेवा आणि UPSC नागरी सेवांद्वारे इतर सेवा आहेत यासाठी ही परिक्षा घेतली जाणार आहे. (UPSC Civil Service Exam 2022)