Vishal Phate News | विशाल फटेविरोधात 129 जणांच्या तक्रारी दाखल, 25 कोटींची फसवणुक

सोलापुर  : Vishal Phate News । शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करून दाम दुप्पट रकमेचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घालणाऱ्या बार्शीच्या विशाल फटे (Vishal Phate Barshi) विरोधात तक्रारींचा ओघ सुरू आहे. फटे विरोधात 129 गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेत तक्रारी केल्या आहेत. दाखल तक्रारीनुसार फसवणुकीचा आकडा 25 कोटींच्या पुढे गेला आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढू लागल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. (129 complaints filed against Vishal Phate, fraud of Rs 25 crore)

शेअर बाजारात (Share Market) पैसे गुंतवून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष विशाल फटने गुंतवणूकदारांना दाखविले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास बसेपर्यंत सुरवातीला तो सुरवातीला पैसे परत करत होता.तो एकाकडून घेतलेले पैसे दुसऱ्या गुंतवणूकदाराला देत असे. या पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक न करताही पैसे फिरवत होता. (Vishal Phate News)

नंतर गुंतवणूकदार वाढल्यानंतर हे त्याच्यासाठी अशक्य झाले. अखेर तो सगळे सोडून फरार झाला होता. फटेच्या विरोधात तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, फसवणुकीचा आकडाही वाढत आहे. आता हा आकडा तब्बल 25 कोटी रुपयांवर गेला आहे. त्याने हे पैसे नेमके कुठे घालवले याचा शोध पोलीस घेत आहेत. (Vishal Phate News)

गुंतवणूकदारांच्याच पैशातून फटेने 45 लाखांची चारचाकी घेतली. याचबरोबर त्याने बार्शीत तब्बल तीन-तीन कोटी रुपयांची दोन घरे बांधली. दरम्यान, गुंतवणूकदारांनी पैशासाठी तगादा लावत त्याचे ऑफिस गाठण्यास सुरवात केली होती. गुंतवणूकदारांचे पैसे घालवल्याने आणि परत देण्यासाठी पैसे नसल्याने तो पसार झाला होता.(Vishal Phate News)

त्यानंतर तो स्वत:हून पोलिसांसमोर शरण आला होता. फटे सध्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी फटेचे संगणक जप्त केले असून, लॅपटॉप व मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविले आहेत. फटेच्या व्यवहारांचे लेखापरीक्षण सुरू असून चार्टर्ड अकांउंटकडून याबाबत पोलिसांनी लवकरच अहवाल मिळणार आहे. त्यातून फटेने गुंतवणूकदारांची रक्‍कम नेमकी कुठे गुंतवली, हे उघड होईल. (Barshi Scam)

विशाल फटेचे मंगळवेढ्यात जुने घर असून, त्याच्या वडिलांच्या नावावर पाच ते सहा एकर शेतजमीन आहे.पोलिसांनी बार्शीचे मुख्याध्याधिकारी व तहसिलदारांना पत्र देऊन फटे व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावरील मालमत्तांची माहिती मागविली आहे.त्याच्या भावाने सुमारे 15 तोळे सोने स्वत:हून पोलिसांकडे जमा केले आहे.

विशाल फटे आणि कुटुंबीयांच्या संपूर्ण मालमत्तांचे मूल्यांकन झाल्यावर गुंतवणूकदारांची यादी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना सादर केली जाणार आहे. यानंतर ही मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. (Vishal Phate Barshi Scam News)

विशाल फटे याचे पुण्यातही व्यवहार होते, पुण्यात फटेची काही संपत्ती आहे का ? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. (Vishal Phate News)