मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा ; राधाकृष्ण विखे पाटलांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांचा कारभार असणार आहे तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दोन जिल्ह्यांचा पालकमंत्रीपदाचा कारभार असणार आहे.

Big News, Chief Minister announced Guardian Minister; Radhakrishna Vikhe Patals are responsible for two districts,

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील.

राज्यातील जिल्हा निहाय पालकमंत्री खालील प्रमाणे

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,

सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,

चंद्रकांत दादा पाटील- पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार,

गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,

गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव

दादा भुसे- नाशिक,

संजय राठोड- यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे- सांगली,

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,

तानाजी सावंत-परभणी,उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,

अब्दुल सत्तार- हिंगोली,

दीपक केसरकर -मुंबई शहर ,कोल्हापूर,

अतुल सावे – जालना, बीड,

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर