मोदी सरकारची मोठी घोषणा, गॅस दोनशे रुपयांनी तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही होणार मोठी कपात,

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : इंधन दरवाढीची झळ बसलेल्या देशभरातील करोडो जनतेसाठी नरेंद्र मोदी सरकारने दिलासा देण्याचा मोठा निर्णय आज घेतला, घरगुती गॅसच्या दरामध्ये तब्बल दोनशे रुपयांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. (Modi government’s big announcement, gas will be reduced by Rs 200 and petrol and diesel prices will also be reduced)

हजाराच्या घरात पोहोचलेला गॅस आता उज्वला योजने अंतर्गत स्वस्त केला जाणार आहे. त्यामुळे जनतेला दोनशे रुपयांनी स्वस्त गॅस मिळण्यास मदत होणार आहे. गॅस बरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी कपात करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे देशभरातील वाहनधारकांना इंधन दरवाढीची मोठी झळ बसली होती.आता केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्यास मदत होणार आहे. सरकारने पेट्रोल वरील आठ रुपये तर पुढील सहा रुपये असा अबकारी कर आज कमी केला आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर २०० रुपयांची (१२ सिलिंडर) सबसिडी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी केली असून तब्बल ९ कोटींहून अधिक लोकांना या सबसिडीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईनं होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.