जामखेड आणि हळगावमध्ये रक्तदान शिबीर संपन्न, 155 रक्तदात्यांनी केले रक्तदान

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड पोलिस दलाच्या पुढाकारातून रविवारी जामखेड तालुक्यातील हळगाव आणि जामखेड शहरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये 155 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. (Blood donation camps held in Jamkhed and Halgaon, 155 blood donors donated blood in Jamkhed today)

Blood donation camps held in Jamkhed and Halgaon, 155 blood donors donated blood in Jamkhed today

जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून मागील वर्षीपासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जामखेड तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यावर्षी सुद्धा 1 मे रोजी जामखेड तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तदान शिबिराचा पहिला टप्पा पार पडला होता.आता या रक्तदान शिबिराचा दुसरा टप्पा रविवार 22 मे रोजी जामखेड शहर व हळगाव पार पडला.

दुसर्‍या टप्प्यात हळगाव आणि जामखेड शहरात पार पडलेल्या रक्तदान शिबिरात मोठा प्रतिसाद मिळाला. 155  रक्तदात्यांनी रक्तदान केले. हळगाव येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरामध्ये जय श्रीराम साखर कारखान्याचे कर्मचारी तसेच हळगाव आणि हळगाव पंचक्रोशीतील तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनपा रक्तपेढी जनसंपर्क अधिकारी संतोष काळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर वसुंधरा पाटील, ज्ञानदेव सांगळे, हसन तालेबिन बासाद, विश्वनाथ पतंगे, योगिता गायकवाड, अन्सारी इबार्तुनिसा यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले.

यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात, कारखान्याचे जनरल मॅनेजर निंबाळकर, उपसरपंच आबासाहेब ढवळे, राजु भैय्या सय्यद, चिफ अकाउटंट सोमनाथ शिंदे, रामदास शिंदे, अविनाश ढवळे, पोलीस कर्मचारी संदिप आजबे, अरुण पवार,अजय साठे, नवनाथ शेकडे, सतिश दळवी, पोलिस पाटील सुरेश ढवळे, नानासाहेब ढवळे, महादेव ढवळे, अशोक ढवळे, कासम शेख, महादेव रंधवे, मारुती करगळ सह आदी उपस्थित होते.