Finance Union Budget Session 2022 | केंद्रीय अर्थसंकल्पात शेतीसंबंधी काय घोषणा करण्यात आल्या ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Finance Union Budget Session 2022 | शेतकरी अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात शेती व्यवसायासाठी केंद्र सरकार काय तरतुदी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील शेती (agriculture) संबंधी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
केंद्र सरकार चालू आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील तरुणांना शेतीसंबंधीच्या स्टार्टअप्सना नाबार्डतर्फे मदत करणार आहे. तसेच ‘किसान ड्रोन’च्या माध्यमातून पिकांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
कृषी विद्यापीठ नवे अभ्यासक्रम आखणार
या आर्थिक वर्षात सेंद्रीय (Organic Farming) तसेच रसायनमुक्त शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. विशेष म्हणजे देशातील सर्व कृषी विद्यापीठांना आधुनिक, झिरो बजेट तसेच तंत्रज्ञानयुक्त शेतीसाठी अभ्यासक्रम आखण्याचे सांगितले जाणार आहे. विशेष म्हणजे सरकारने यावेळी शेतकऱ्यांना एमएसपीअंतर्गत तब्बल 2.7 लाख कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
सेंद्रीय शेती, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार
केंद्र सरकारने शेतकरी आणि शेतीसाठी भरीव मदत दिली आहे. तसेच यावेळी जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी जलसिंचन योजनेतून तब्बल 9 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच केंद्र सरकारकडून यावर्षी सेंद्रीय शेती, रसायनमुक्त शेतीसाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- Pradhan Mantri Pik Vima Yojana 2022 । प्रधानमंत्री पीक विमा योजना । खरीप हंगाम 2022 |अहमदनगर जिल्ह्यातील 10 पिकांसाठी 4 लाख 30 हजार हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्षित
- रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल : जर कोणी आडवं आलं तर याद राखा
- 11th Admission । अकरावीच्या प्रवेशासाठी अजून वाट पहावी लागणार, कारण…
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचा फुल टू जल्लोष
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांत कुठे कुठे भेटी दिल्या ? काय निर्णय घेतले ? जाणून घेऊयात एका क्लिकवर
तेलबियांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार
ग्रामीण भागातील तरुण शेतकऱ्यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. नाबार्डकडून शेतीशी निगडीत असलेल्या स्टार्टअप्सना फंड दिला जाणार आहे. तसेच तेलाच्या भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तेलाबीयाच्या आयातीवर अवलंबून न राहण्यासाठी यावर्षी शेतकऱ्यांना तेलबियांच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजनांची अमंलबजावणी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना तंत्रज्ञानयुक्त, डिजिटल सुविधा देण्यासाठी पीपीपी पद्धतीने योजना आखल्या जाणार आहेत.
किसान ड्रोनचा वापर, झिरो बजेट शेतीसाठी अभ्यासक्रम
पिकांचे मूल्यमापन व्हावे यासाठी किसान ड्रोनचा वापर केला जाणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून औषधी, किटकनाशक तसेच न्यूट्रीशन्स फवारणीसाठीदेखील ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रोत्सहित केले जाणार आहे. कृषी विद्यापीठांना झिरो बझेट शेती, ऑरगॅनिक फार्मिग, आधुनिक शेतीचा प्रसार तसेच प्रचार व्हावा अभ्यासक्रम तयार करण्याचे सांगितले जाणार आहे.