Union Budget 2022 |  केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केल्या महत्वाच्या घोषणा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Union Budget 2022 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. देशात 400 नव्या वंदे भारत रेल्वे सुरू करण्याबरोबरच मेट्रोचे जाळे विस्तारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पात त्यांनी सिंचन-पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर दिला आहे. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार आहे. देशात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर काम सुरू असून गंगेच्या काठावर राहणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.

शेती क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. तसेच पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. देशातील 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी नवीन योजना राबविणार आहे.

आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर सरकारकडून धान्याची खरेदी करण्यात आली आहे. त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर तेलबिया आयात केल्या जातात, तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार शेतकऱ्यांना पिकावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार आहे.

तसेच नैसर्गीक शेतीसाठी, झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देणार, त्याचे नियोजन करण्यासाठी योजना राबविणार. ग्रामीण विकासासाठी प्रयत्न करणार आहे. कृषी आधारीत स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देणार, युवकांना मदत करणा्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून भांडवल पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच 25 हजार किमी राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे खालील प्रमाणे

130 लाख  सूक्ष्म उद्योगांना मदतीचं काम केलं

या कोरोनाच्या काळात या उद्योगांवर विपरित परिणाम झाला

हॉस्पिटलिटी उद्योगांना कोरोनापूर्व स्थितीत पोहोचण्यासाठी  प्रयत्न

50 हजार कोटी रुपयांची गॅरंटी देण्यात येणार

सहा हजार कोटींचा रॅम प्रोग्राम सूक्ष्म आणि लघू उद्योगाच्या विकासासाठी राबवणार

राज्य सरकारांनी कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात नैसर्गिक शेती, झिरो बजेट शेतीचा समावेश

नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासह आयटी बेस सपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न

जलसिंचन वाढवण्याचा प्रयत्न, सौर उर्जेचा वापर, पेयजलासाठी

देशात 60 लाख नोकर्‍या निर्माण करणार

1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली

गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार, पेन्नार कावेरी नद्यांसाठी योजना राबवण्यात येईल

केंद्राकडून गहू आणि धानाची विक्रमी खरेदी

किमान आधारभूत किमतीद्वारे विक्रमी खरेदी

गंगा नदीच्या पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

शेतीच्या क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांचं सहकार्य घेतलं जाईल

छोट्या शहरात काम करणाऱ्या उद्योजकांना याचा लाभ होणार आहे

पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार

रेल्वेचं जाळं विकसित करणार

मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार

मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार

2022-2023 मध्ये आठ ठिकाणी रोप वे सुरु करणार

रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार

पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय

या योजनेसाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित

वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार

यामुळं प्रवासाचा वेळ कमी होणार

इंधनाचा खर्च कमी वाचणार

एलआयसीचा आयपीओ लवकरच येणार

गती शक्ती योजनेद्वारे पायाभूत सोयी सुविधांचा विकास

सबका साथ सबका विकास आणि सबका कल्याण हे सरकारचं धोरण

नागरिकांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी आम्ही प्रयत्नशील

कोरोना लसीकरणाचा  कार्यक्रम राबवला

कोरोनाच्या काळात आरोग्यावर भर

आत्मनिर्भर भारताला मोठा प्रतिसाद मिळाला

30 लाख नोकऱ्या निर्माण करण्यासाठी प्रयत्न

बँकाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहोत

आरोग्य सेवांवर भर

कोरोनाकाळात मानसिक समस्या वाढल्या

त्यामुळे देशात 21 मानसिक समस्या समुपदेशन कार्यक्मर राबवणार

वन क्लास वन टीव्ही चॅनेल

विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावी साठी  चॅनेल सुरु करणार

त्याची संख्या 200 पर्यंत वाढवणार

प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील

यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजीटल साधनांचा वापर

डिजीटल विद्यापीठ सुरु करणार

डिजीटल विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये  सुरु होणार

डिजीटल विद्यापीठांशी देशातील नामांकित विद्यापीठांचे करार असणार

कौशल्य विकासासाठी ऑनलाईन ट्रेनिंग देणार

स्टार्टअप विकासासाठी प्रयत्न करणार

सर्व राज्यातील आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार

बातमी अपडेट होत आहे…. पेज रिफ्रेश करत रहा