जामखेड टाइम्स वृत्तसेवा । केदारनाथ परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे केदारनाथ येथे हेलिकॉप्टर कोसळून सहा जण ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.
गुप्तकाशीहून जेव्हा हे हेलिकॉप्टर केदार घाटीकडे निघाले तेव्हा ते गरुडचट्टी येथे कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये ६ जण होते असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हे हेलिकॉप्टर खासगी कंपनीचं असल्याचं सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टर संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे.घटनास्थळी मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
हेलिकॉप्टर दुर्घटना झालेल्या ठिकाणी बचाव पथकही रवाना झालंय. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग भडकली होती. हेलिकॉप्टरचा अक्षरशः चुराडा झाल्याचे थरकाप उडवणारे फोटोही समोर आले आहेत. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.नेमका ही दुर्घटना कशामुळे घडली, याची उकल होऊ शकलेली नाही.
खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, तज्ज्ञांकडून आता या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास केला जाणार आहे.
केदारनाथपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गरूरचट्टी या गावात हेलिकॉप्टर कोसळलं. यानंतर एकच खळबळ उडाली. हेलिकॉप्टर दुर्घटनेवेळी काळजाचा थरकाप उडवणारा मोठा आवाज झाला होता. त्यामुळे आजूबाजूचे लोकही धास्तावले. डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं.
आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये 8 भाविक होते. या भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जात असताना काळानं 6 प्रवाशांना घाला घातला. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.