ध्वजारोहणाच्या वेळी शाॅक लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी जखमी

बिहार, बक्सर वृत्तसंस्था । ध्वजारोहण करताना एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. ध्वजारोहणाच्या पाईपमध्ये विजेच्या प्रवाह उतरल्याने झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक मुले गंभीर जखमी झाली आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ही घटना बिहारच्या बक्सर येथे घडली आहे. (bihar accident news, flag hoisting in school one child died due to current in pipe many injured)

बिहारमधील बक्सरच्या नाथुपूर प्राथमिक शाळेत झेंडा फडकवताना शाळकरी मुलांना विजेचा धक्का लागल्याने मोठा अपघात झाला. यात एका मुलाचा मृत्यू झाला तर 4 मुले गंभीर जखमी झाली आहेत. त्याच्यावर बक्सर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती देताना मुलांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुले ध्वजारोहण करण्यासाठी शाळेत पोहोचत असताना ध्वज फडकवला जाणाऱ्या पाईपमध्ये करंट आला. त्याचवेळी शाळकरी मुलांना त्याचा धक्का बसला.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आलेल्या जखमी मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत.या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, मुलांचे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.

स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मुलांवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय पाईपमध्ये करंट कसा आला? हे आता तपासलं जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा आता सखोल तपासही केला जाणार आहे.

विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात येत. बिहारमधील नाथुपूर येथील प्राथमिक शाळेतही तिरंगा फडकवण्यासाठी मुले शाळेत पोहोचली होती. पण यावेळी ध्वजारोहणापूर्वी मुलांनी ध्वजाच्या पाईपला हात लावला. तेव्हा त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसला. यादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.