Suvarna Waje’s Body Found in Burnt Car | धक्कादायक : जळालेल्या कारमध्ये आढळला महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह, नाशिकमध्ये उडाली खळबळ, अपघात की घातपात पोलिसांचा तपास सुरू

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Suvarna Waje’s body found in burnt car | नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जळालेल्या कारमध्ये नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेनं नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मृतावस्थेत आढळून आलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पतीने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.मात्र, मंगळवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांना एका कारला आग लागली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

सुवर्णा वाजे असे मृत वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. सुवर्णा वाजे या नाशिक महानगरपालिकेत कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी रात्रीपर्यंत त्या कामावरून घरी न परतल्याने त्यांच्या पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

मात्र,पोलिसांना मंगळवारी रात्रीच्या सुमारास वाडीवऱ्ह गावाजवळ एक कार जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. या कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

सुवर्णा वाजे या काल, मंगळवारी दुपारी 4.30 वाजता घरातून महापालिका रुग्णालयात कामावर गेल्या होत्या. रात्री 9 वाजून गेल्यानंतरदेखील पत्नी घरी न आल्याने बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीने तिला मेसेज केला. त्यावेळी पत्नीच्या मोबाइलमधून ‘मी कामात आहे, वेळ लागेल,’ असा रिप्लाय दिला मात्र त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ आला.

त्यानंतर पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्ह गावाजवळ जळालेल्या कारमध्ये या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. ही हत्या आहे की अपघात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

(Maharashtra Crime News Today, Shocking, Woman medical officer Suvarna Waje’s body found in burnt car, commotion in Nashik, Nashik Municipal Corporation)