खोकल्याच्या औषधामुळे 66 मुलांनी गमावला जीव ?, डब्ल्यूएचओने भारतीय औषध कंपनी विरोधात केला खळबळजनक दावा, कुठे घडली घटना वाचा सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । लहान मुलांना होणाऱ्या सर्दी खोकल्यासाठी कायम घरात असणाऱ्या कफ सिरपचा उपयोग होतो, मात्र हेच कफ सिरप लहान मुलांच्या जीवावर उठले तर ? विश्वास बसत नाही ना ? तर अशीच एक घटना जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात WHO ने उजेडात आणली आहे. खोकल्याचे औषध दिल्यामुळे 66 लहान मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, असा WHO ने दावा केल्याने जगभर खळबळ उडाली आहे.

66 children lost their lives due to cough medicine, WHO made sensational claim against Indian drug company Medern Pharmaceutical Limited,

WHO उघडकीस आणलेली घटना आफ्रिका खंडातील गांबिया या देशात घडली आहे. या घटनेत भारतीय कंपनीने बनवलेल्या कंजेस्टंट आणि कफ सिरप पिल्यामुळे 66 मुलांचा मृत्यू झाला आहे, असा दावा WHO ने केला आहे. तसेच संबंधित सिरप न वापरण्याच्या सुचना जारी केल्या आहेत, यामुळे भारतासह जगभर खळबळ उडाली आहे.

WHO ने भारतीय औषध कंपनी मेडर्न फार्मास्युटीकल लिमिटेडने बनवलेल्या चार कफ सिरप औषधांबाबत अलर्ट जारी केला आहे. चारही कफ सिरपच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये डाफ़एथिलीन ग्लायकोल आणि इथनिल ग्लायकोलचे अस्वीकारार्ह प्रमाण आढळून आल्याचे WHO ने म्हटले आहे.

दुषित उत्पादनामध्ये खालील चार उत्पादनांचा समावेश

  • प्रोमिथायजिन ओरल सोल्युशन Promethazine Oral Solution
  • कोफेक्समेलिन बेबी कफ सिरप Kofexmalin Baby Cough Syrup
  • मेकॉफ बेबी कफ सिरप Makoff Baby Cough Syrup
  • मॅग्रिप एन कोल्ड सिरप Magrip N Cold Syrup

डब्ल्युएचओनं आपल्या अलर्टमध्ये म्हटलं आहे की, हे सर्दी-खोकला सिरप गांबियामध्ये झालेले 66 मृत्यू आणि निर्माण झालेल्या गंभीर मूत्रपिंड समस्यांसाठी जबाबदार असू शकतं. रिपोर्टनुसार, या सिरपमध्ये डाएथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचं अस्वीकार्य प्रमाण असल्याची खात्री झाली आहे.

जे मानवासाठी अत्यंत धोकादायक आहे. विशेषत: ही औषधं लहान मुलांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात. यामुळे ते घेणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. असा WHO ने दावा केला आहे.या घटनेबाबत विविध जागतिक आणि भारतीय माध्यमांनी वृत्त दिले.