छत्रपती संभाजी महाराजांनी साधला कवी प्रा आ.य. पवार यांच्याशी संवाद, पवारांच्या समीक्षा ग्रंथाचे केले कौतुक 

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । स्वराज्य संघटनेचे संस्थापक तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी जामखेडला नुकतीच भेट दिली. या भेटीत त्यांनी ख्यातनाम आणि साहित्यकार प्रा आ.य. पवार यांच्याशी संवाद साधला. प्रा पवार हे करत असलेल्या साहित्य सेवेचे संभाजी महाराजांनी यावेळी कौतूक केले.

Chhatrapati Sambhaji Maharaj interacted with poet Prof. Pawar, Appreciation of Pawar's Samiksha book

जामखेड तालुक्यातील बावी येथील मुळ रहिवासी आणि सध्या जामखेड येथे राहत असलेले कवी प्रा आ.य. पवार हे शेतीमातीच्या कवितांसाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. आजवर त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहे. ते ग्रामीण जीवनावर भेदक भाष्य करत असतात. त्यांच्या कविता नागपूर, नांदेड, मुंबई, अमरावती विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. तसेच कर्नाटक विद्यापीठाच्याही पदवी अभ्यासक्रमात ‘धूळपेर काव्यसंग्रह’ समाविष्ट आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj interacted with poet Prof. Pawar, Appreciation of Pawar's Samiksha book

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज छत्रपती संभाजी महाराज नुकतेच जामखेड दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार यांच्या निवासस्थानी  सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संभाजी महाराजांनी कवी प्रा आ.य. पवार यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

प्रा पवार हे करत असलेल्या साहित्य सेवेचे संभाजी महाराजांनी यावेळी कौतूक केले. यावेळी कवी आ. य. पवारांच्या निसर्ग विज्ञान कवितेवर लातूर येथील राष्ट्रीय चर्चासत्राने प्रसिद्ध केलेला समीक्षा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांना भेट ‌देण्यात आला.

दरम्यान, यावेळी अवधूत पवार मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.

Chhatrapati Sambhaji Maharaj interacted with poet Prof. Pawar, Appreciation of Pawar's Samiksha book

यावेळी अजय सिंह सावंत, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, राष्ट्रवादीचे युवा नेते गणेश वारे, प्रशांत काका राळेभात, हाजी जावेद सय्यद, क्षक प्रा.विजया नलवडे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ,शिवराज घुमरे, आदींसह मान्यवर उपस्थित होते. संभाजी ढोले यांनी सर्वांचे आभार मानले.