41 दिवसांची झुंज अपयशी, कॉमेडिचा बादशहा राजु श्रीवास्तवचे निधन, बाॅलीवुडवर पसरली शोककळा

Raju Srivastava News: अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या काॅमेडियन राजु श्रीवास्तवची 41 दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली. (Comedy king Raju Srivastava passes away) राजु श्रीवास्तवचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी तो 58 वर्षांचा होता. कॉमेडीचा बादशहा म्हणून त्याला ओळखले जात होते.

41 days struggle failed, comedy king Raju Srivastava passed away, mourning spread across Bollywood

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

41 days struggle failed, comedy king Raju Srivastava passed away, mourning spread across Bollywood

90 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरला तो राजु श्रीवास्तव.राजुनं त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्याचे नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. आता मात्र त्याच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

राजुनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानं मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते.राजू श्रीवास्तव यांनी 1993मध्ये लग्न केलं. शिखा श्रीवास्तव असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान आहे तर मुलीचं नाव अंतरा आहे.

काही दिवसांपूर्वी राजुला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो नेहमीप्रमाणे ट्रेड मिलवर धावत होता. अचानक त्याला भोवळ आली आणि तो तसाच ट्रेड मिलवर पडल्याचे सांगण्यात आले. त्याला हदयविकाराचा झटका आल्याचे सुत्रांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही सांगण्यात आले होते.

त्याच्यावर गेल्या ४१ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. तो व्हेंटिलेटरवर होता. डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड म्हणून घोषित केलं होतं.त्याच्यावर डॉक्टरांची मोठी टीम उपचार करत होती, मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले असून आज अखेर राजू श्रीवास्तवची प्राण ज्योत मालवली.यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.