जामखेड तालुक्यातील चोंडीत रक्तगट तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडीत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 200 च्या आसपास विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. हे शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंडी येथे उत्साहात पार पडले. उपसरपंच कल्याण शिंदे यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Blood group testing camp completed at Chondi in Jamkhed taluka

यावेळी चोंडीचे उपसरपंच कल्याण शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस पांडुरंग उबाळे, युुवा उद्योजक विशाल शिंदे, माजी सरपंच अशोक देवकर, मुख्याध्यापक अव्हाड सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शिंदे, हजारे सर, सरोदे सर, नवरे सर, तांबे सर, भागवत सर, फुलमाळी सर, जवणे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य संदीप सोनवणे, दत्तात्रय शिंदे, हनुमंत उदमले, अर्जुन सोनटक्के, दत्तात्रय शिंदे, अंगद जगदाळे, आलेष शिंदे, तुषार उबाळे, बुवासाहेब भांडवलकर, कैलास शिंदे, सुजित शिंदे, शंकर शिंदे, अजिंक्य शिंदे, सोमनाथ शिंदे, ओंकार शिंदे, सतीश लांबाटे सह आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Blood group testing camp completed at Chondi in Jamkhed taluka

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यात भाजपच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले चोंडीचे उपसरपंच कल्याण शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरातून 200 च्या आसपास विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.