जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील मोहा – रेडेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागातील एका विद्यालयातून घरी निघालेल्या 17 वर्षीय मुलीचा भरदुपारी विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका जणाविरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी मुलगी ही प्रदिपकुमार महादेव बांगर उच्च माध्यमीक विदयालय मोहा येथुन पायी घरी जात होती. ती हाॅटेल निसर्गराज जवळील एका वडाच्या झाडाजवळून जात असताना आरोपी सचिन राजेंद्र बांगर हा मोटारसायकल घेऊन तिथे आला.
त्याने फिर्यादीचा डावा हात धरुन तिला शेताकडे ओढुन नेले आणि मारहाण केली, तसेेच फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना 21 रोजी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोहा – रेडेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे पीडिता प्रचंड घाबरलेली होती, त्याच अवस्थेत ती घरी परतली. घडलेला सर्व प्रकार तीने घरी सांगितला. त्यानंतर 21 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जामखेड पोलिस स्टेशनला 17 वर्षीय विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन राजेंद्र बांगर (रा. रेडेवाडी ता जामखेड) याच्याविरोधात कलम 354, 354 (ड), 323, बालकांचे लैंगीक अपराधापासुन संरक्षण अधि. 2012 चे क 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.