Hindustani Bhau Vikas Pathak | विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी चिथावणी देणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला कोर्टाने सुनावली पोलिस कोठडी
मुंबई : Hindustani Bhau Vikas Pathak | दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau Vikas Pathak) उर्फ विकास पाठकला चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.
सोमवारी राज्यभरात दहावी-बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता.
धारावी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली. (Hindustani Bhau Get Four Days Police Custody)
कोरोनामुळे (Corona Pandemic) गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाइन होत आहे. मग परीक्षा ऑफलाइन कशासाठी? असं म्हणत सोमवारी दहावी-बारावीचे लाखो विद्यार्थी राज्यभरात रस्त्यावर उतरले होते. (Student Protest For Online Exam ) अचानक झालेल्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती.
- जामखेड: लग्न सोहळ्यातून दीड लाखाचा कॅमेरा चोरीला, आदित्य गार्डन येथील घटना, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
- कर्जत-जामखेडला मिळणार ३ आमदार; कोण आहेत सुनील कर्जतकर? जाणून घेऊयात त्यांचा राजकीय प्रवास
- धक्कादायक! पोटच्या मुलाने केली बापाची हत्या; जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील खळबळजनक घटना
- मुंबई: चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला मिळणार चालना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Manohar Mama Bhosale Arrest: पूजेच्या नावाखाली व्यावसायिकाची लूट; भोंदू मनोहर भोसलेचा खेळ खल्लास, कुर्डुवाडी पोलिसांची मोठी कारवाई
या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली होती तसेच या दोघांना पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान, विकास पाठक याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.