आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टाचा मोठा दणका, जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी राणेंना अटकेची शक्यता !

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणेंना (Nitesh Rane) कोर्टाने मोठा दणका दिलाय. नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून ( Nitesh Rane bail Reject ) लावला आहे, त्यामुळे नितेश राणेंना कधीही अटक होऊ शकते. त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कारण राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले.संतोष परब हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरण नितेश राणे यांना चांगलच भोवलं आहे.

सतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली तिथे त्यांना पहिला दणका देत जामीन फेटाळला, त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली तिथे त्यांना दुसरा मोठा दणका बसला कारण हायकोर्टानेही नितेश राणेंना जामीन देण्यास नकार दिला, त्यानंतर राणेंनी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही, सुप्रीम कोर्टानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत, राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण देत, पुन्हा सत्र न्यायालयाचा रस्ता दाखवला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत, नितेश राणेंच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले.

कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा

नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. कारण राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले.

मला कायदा शिकवू नका अशी आक्रमक प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. जामीन फेटाळल्यानंतर निलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची झाल्याचेही दिसून आलं. पोलिसांनी गाडी का थांबवली यावरून सवाल उपस्थित करत, त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश राणे गाडीतून खाली उतरले आणि कोर्टात गेले. त्याआधी त्यांनी त्यांच्या वकिलांशीही चर्चा केली.

निलेश राणे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची गाडी तुम्ही अडवू शकत नाही, अशी भूमिका निलेश राणे यांनी घेतली यावरूनच ही बाचाबाची झाली. सुप्रीम कोर्टाने आम्हाला दहा दिवसांचं संरक्षण दिलं आहे. तर तुम्ही गाडी का अडवता असे म्हणत निलेश राणे पोलिसांवर भडकताना दिसून आले.