Vidhan Parishad election results LIVE Updates 2022 | काँग्रेसकडून भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप, निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने आक्षेप फेटाळला, आता पुढे काय ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Vidhan Parishad election results LIVE Updates 2022 । विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडले. 286 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला होता, परंतू निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काँग्रेसने घेतलेला आक्षेप फेटाळून लावला आहे.

राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपने राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या एक एक अशा तीन मतांवर आक्षेप घेतला होता, राज्य निवडणूक अधिकाऱ्याने आक्षेप फेटाळून लावल्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टामध्ये गेला होता.

खळबळजनक  : एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला !

त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने तब्बल दहा तासानंतर शिवसेनेच्या एका आमदाराचे  मत बाद करत मतमोजणी घेण्याचे आदेश दिले होते. तसेच पुनरावृत्ती विधान परिषद निवडणुकीत होणार अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस आक्षेप फेटाळून लावलं तर आता काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे.

कर्जत जामखेडला मिळणार दुसरा आमदार, उत्सुकता शिगेला, विधानपरिषदेचे मतदान सुरू !

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन मतांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने काँग्रेसचा हा आक्षेप फेटाळून लावला आहे  त्यामुळे काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे.त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हाय वोल्टेज ड्राम्यास सुरुवात झाली आहे.

खळबळजनक : अहमदनगर जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल, 10 जिवंंत काडतुसांसह तिघांना बेड्या, एलसीबीची धडक कारवाई

दरम्यान राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेस कोर्टामध्ये जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान पाच वाजता सुरू होणारी विधानपरिषदेची मतमोजणी काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांमुळे लांंबली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ही मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे. दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची यासंदर्भात बैठक सुरू आहे. बैठक संपल्यानंतरच मतमोजणीचे चित्र स्पष्ट होणार आहे.