Vidhan Parishad election results 2022 LIVE | भाजप आणि काँग्रेसने आक्षेप घेतल्यामुळे मतमोजणी थांबली, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले लक्ष !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Vidhan Parishad election results 2022 LIVE | विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर काँग्रेसने भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला होता परंतू. केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावत सर्व मते वैध ठरवले. त्यानंतर मतमोजणी सुरू झाली झाली.

दरम्यान मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मतपत्रिकेची छाननी करण्यात आली. मतपत्रिकेची छाननी पुर्ण होऊन मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या मतपत्रिकेवर आक्षेप घेतल्याने मतमोजणी थांबवण्यात आली आहे.

मताचं identification व्हावं यासाठी मतपत्रिकेवर ओव्हर writing करण्यात आलं असा आशिष शेलार यांनी केला आहे.  मत बाद करण्यात यावं अशी मागणी शेलार यांनी केली आहे. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीत एका मतावरून वादावादी सुरू आहे.

खळबळजनक  : एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, सांगली जिल्ह्यातील घटनेने महाराष्ट्र हादरला !

मतांची छाननी आधीच पूर्ण झालीय. सर्व मतं वैध ठरलीत, अशी माहिती आधीच देण्यात आली होती असा दावा मविआने केला आहे. (Vidhan Parishad election results 2022 LIVE, Counting of votes started but Ashish Shelar objected to one vote, mlc counting stopped)

खळबळजनक : अहमदनगर जिल्ह्यात आठ गावठी पिस्तूल, 10 जिवंंत काडतुसांसह तिघांना बेड्या, एलसीबीची धडक कारवाई

मतमोजणी थांबल्यानंतर आता दोन्हीकडचे नेते निवडणूक निर्णय अधिकारी याकडे दाद मागत आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्या एका मतासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय आल्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे निकाल लागण्यास आणखीन काही तास वाट पाहावी लागणार आहे, असेच सध्या तरी दिसत आहे.

कर्जत जामखेडला मिळणार दुसरा आमदार, उत्सुकता शिगेला, विधानपरिषदेचे मतदान सुरू !

ताजी बातमी

दरम्यान काँग्रेसने भाजपा उमेदवार उमाताई खापरे यांच्या पहिल्या पसंतीच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतल्याची माहिती आता समोर येत आहे, त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या कोट्यातील मतावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार राज्य निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांची या संदर्भामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला असून केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देते त्यावरच मतमोजणी कधी होणार हे निश्चित होणार आहे.

मतमोजणी थांबल्यानंतर आता दोन्हीकडचे नेते निवडणूक निर्णय अधिकारी याकडे दाद मागत आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्या एका मतासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आल्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरू होणार आहे त्यामुळे निकाल लागण्यास आणखीन काही तास वाट पाहावी लागणार आहे असे सध्या तरी दिसत आहे.