CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंच्याविरोधात शिवसेनेची मोठी कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना (shiv sena)आक्रमक झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. (CM Eknath Shinde news, Shiv Sena’s big action against Chief Minister Eknath Shinde)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात आक्रमक धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. तसे पत्र आज शिवसेनेकडून शिंदे यांना देण्यात आले आहे.

भाजपच्या विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांसह अनेक बड्या नेत्यांची दांडी

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेत परत येण्याचे दोर आता कापले आहेत, असेच या कारवाईवरून दिसत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील नव्हे तर या नेत्याला विधानसभा अध्यक्षपदाची उमेदवारी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मागील दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले होते. शिंदे यांच्या या बंडाला शिवसेनेतील तब्बल 39 आमदारांनी पाठिंबा दिला होता. यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या आठ मंत्र्यांचा समावेश होता. तब्बल दहा दिवसाच्या या बंडाच्या नाट्यावर काल 30 जून रोजी पडदा पडला.

Operation Muskan | अहमदनगर जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 620 लोकांचा शोध, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार काल 30 जून रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आणि राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली.

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जामखेड तालुक्याला 9 कोटींचा निधी मंजूर

दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली होती यावेळी ठाकरे बोलताना म्हणाले होते की, शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होणं हे जनतेला आवडेल न आवडेल हे माहिती नाही, परंतु हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. तो धृतराष्ट्रासारखा नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

माझ्या पाठित सुरा खुपसला तो मुंबईकरांच्या पाठित खुपसू नका – उध्दव ठाकरे

दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली आहे. तसे पत्र त्यांनी शिंदे यांना दिले आहे. शिवसेनेच्या या कारवाईमुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या गटाचे शिवसेनेत परतण्याचे दोर कापले गेले असल्याचे आता राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.