Operation Muskan | अहमदनगर जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 620 लोकांचा शोध, पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Operation Muskan | अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरविलेल्या महिला, पुरुष तसेच अपनयन व अपहरण केलेली बालके यांच्या शोधासाठी राबवण्यात आले ऑपरेशन मुस्कान विशेष मोहीम अंतर्गत ६२० जणांना शोधण्याची मोठी कामगिरी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने राबवली.

अहमदनगर जिल्ह्यात 1 जून ते 30 जून 2022 या कालावधीत जिल्हा पोलीस अधीक्षक मनाेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांनी ऑपरेशन मुस्कान 11/2022 ही मोहिम राबवली होती, या मोहिमेअंतर्गत हरवलेल्यांचा शोध, तसेच अपहरण झालेल्यांचा शोध घेण्यात आला.

अहमदनगर जिल्ह्यात 189 लहान मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.रेकॉर्डवरील या गुन्ह्यांचा पोलिसांनी तपास केला असता 59 गुन्ह्यातील 61 बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये 53 मुली व 08 मुले यांचा शोध घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात एकुण 1979 व्यक्ती हरवलेल्या होत्या. त्यापैकी 507 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. तसेच 1086 हरवलेल्या महिलांपैकी 298 महिला व 885 पुरुषांपैकी 209 पुरुषांचा शोध घेण्यात आला आहे.

तसेच पालकांसोबत गेलेले एकुण मुले/मुली 153 पैकी एकुण 34 त्यापैकी 15 मुली व 19 मुले यांचा शोध घेण्यात येऊन त्यांना नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आले आहे.

अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील 2 सज्ञान पुरुष मिळून आले, त्यांना संबंधित पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आले आहे. तसेच रेकॉर्ड व्यतीरिक्त 20 बालके त्यापैकी 9 मुली व 11 मुले मिळून आले आहेत.या सर्वांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ऑपरेशन मुस्कान दरम्यान एकुण 620 जणांचा यशस्वीरित्या शोध घेण्यात आला. यामध्ये मुले, मुली, स्त्री. पुरुष यांचा समावेश आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर,पोलीस उप अधिक्षक कमलाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक भिमराव नंदूरकर, पोसई, भैय्यासाहेब देशमुख, महिला पोलीस हेडकाँन्स्टेबल अर्चना काळे,अनिता पवार, महिला पोलीस काँस्टेेबल छाया रांधवन, रुपाली लोहाळे, चालक एस.एस.काळे यांनी ही कारवाई केली.