अखेर ‘त्या’ वादग्रस्त अतिक्रमणांवर पडला हातोडा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातील बाजारतळावर उभारण्यात आलेल्या ‘त्या’ आठ नव्या टपर्यांचा मुद्दा भलताच वादग्रस्त ठरू लागला आहे. या टपर्या हटवण्यासाठी थेट आमदार रोहित पवारांना नगरपरिषदेला आदेश द्यावे लागले. त्यानंतर सोमवारी वादग्रस्त अतिक्रमणे हटवण्याची मोहिम नगरपरिषदेने राबवली. मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी धडक कारवाई राबवत त्या पुढार्यांना मोठा दणका दिला आहे. आज पार पडलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये नव्या अनधिकृत टपर्यांपैकी काही टपर्या अजुनही हटवल्या गेल्या नाहीत यामुळे जनतेत आता नाराजीचा सुर उमटू लागला आहे.