जामखेडमध्ये महेंद्र राळेभात यांच्या तिरंगा रॅलीची जोरदार चर्चा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड शहरात पार पडलेल्या शंभर फुट उंच तिरंगा ध्वजाच्या ध्वजारोहण सोहळ्यात राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते महेंद्र राळेभात यांच्या तिरंगा रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधले. युवा नेते महेंद्र राळेभात यांच्या तिरंगा रॅलीची दोन दिवसांपासून जामखेड शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

Mahendra Ralebhat's tiranga rally in Jamkhed is heavily discussed

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जामखेडच्या संविधान चौकात आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 100 फुट उंच तिरंगा ध्वज 15 ऑगस्ट रोजी फडकाविण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शहाजी राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीचे लोकप्रिय युवक कार्यकर्ते महेंद्र राळेभात यांनी शिक्षक काॅलनीपासून ते संविधान चौकापर्यंत भव्य अशी तिरंगा रॅली काढली होती.

महेंद्र राळेभात यांनी काढलेल्या तिरंगा रॅलीत महिला, पुरूष, युवक, युवती उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ही रॅली जयहिंद चौकात येताच आमदार रोहित पवार या रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली जयहिंद चौकातून मेन पेठ मार्गे संविधान चौकातील मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचली. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. देशभक्तीपर घोषणा देत कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले होते. या रॅलीने शहरवासियांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून याच रॅलीची जामखेड शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.

या रॅलीमध्ये युवा नेते संभाजी राळेभात, तानाजी राळेभात, हरिभाऊ आजबे, गजानन राळेभात, बाळासाहेब माने, अनिल बाबर, बाळू राऊत, बंटी माने, फय्याज शेख, निलेश राऊत, कांबळे दाजी, गणेश डोके, संजय डोके, गणेश राऊत, संतोष कदम, जयसिंग डोके, सचिन डोके, राहुल शिंदे दिलीप डोके, संतोष घोलप, जालिंदर तांगडे सह आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.

तसेेच आरती महेंद्र राळेभात, दिपाली राळेभात, मंगल राळेभात, कल्पना राळेभात, संध्या राळेभात, आशाबाई राळेभात, पुनम राळेभात, सुवर्णा राळेभात, सृष्टी राळेभात, अश्विनी इंगळे, अश्विनी गंडाळ, सारिका गंडाळ, सुनिता कांबळे, सारिका तवटे, शारदा मोरे, मंगल शिंदे, मंगल मोरे, अंजली बडे, सुरेखा राळेभात, राणी राळेभात, रूपाली राळेभात, पुनम घोडेस्वार, प्रज्ञा घोडेस्वार, श्यामल डोके, गायकवाड ताई, पुष्पा चिमटे, वनिता मोहिते, हिराबाई शिंदे, आशाताई यादव, उमा डोके, राजश्री तागडे, सीमा घोलप चंद्रभागा घोलप, कोमल गुंड, आशा बांगर, वंदना ठोसर, सह असंख्य महीला तरुणी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.