Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh | सोमवारी जामखेड बंद राहणार  : महाविकास आघाडीने दिली महाराष्ट्र बंदची हाक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी घटनेच्या निषेधार्थ सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेस च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावर बंदच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत सोमवारचा बंद पुर्ण ताकदीने यशस्वी केला जाईल असा इरादा स्पष्ट केला आहे. Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh Jamkhed will be closed on Monday

उद्या सोमवारी महाविकास आघाडीच्या वतीने जामखेडच्या खर्डा काॅर्नर परिसरात सकाळी ११ वाजता एकत्र जमण्याचे अवाहन करण्यात आले आहे. या ठिकाणी लखीमपुर खेरी घटनेचा निषेध नोंदवला जाणार आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याची घटना उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या ठिकाणी घडली होती.या घटनेचा निषेध म्हणून उद्या महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हा अश्या पोस्ट जामखेड राष्ट्रवादी व कॉंग्रसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आल्या आहेत.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला भाजपच्या गोटातून विरोध होऊ लागला आहे. बंद विरोधात काहींनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकल्या आहेत.

 

web titel : Mahavikas Aghadi calls for Maharashtra Bandh Jamkhed will be closed on Monday