दिव्यांगांच्या घरकुलासाठी महसुलची जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करणार – मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग बांधव घरकुलापासुन वंचित राहणार नाहीत यासाठी सुधारीत डीपीआर अहवालात ज्या दिव्यांगांकडे स्वता:च्या जागा आहेत अश्या दिव्यांगांच्या प्रस्तावांचा समावेश केला जाईल.तसेच ज्यांच्याकडे जागा नाहीत असे दिव्यांग घरकुल योजनेपासून वंचित राहू नये यासाठी महसुलची जागा त्यांना मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाईल असे ठोस आश्वासन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी आज जामखेडमध्ये बोलताना दिले.

Will submit a proposal to the Collector to get the place of the Revenue Department for the disabled  - Mininath Dandavate

जामखेड तालूका प्रहार जनशक्ती पक्ष आणि जामखेड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग बांधवांच्या मेळाव्याचे आज जामखेड शहरातील लोकमान्य वाचनालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून दंडवते बोलत होते.

यावेळी नगरपरिषदेचे अभियंता प्रशांत सोनटक्के, प्रधान मंत्री आवास योजना (शहरी घरकुल) किरण भोगे, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, प्रहारचे शहराध्यक्ष नय्यूमभाई सुभेदार, तालुका कार्याध्यक्ष भीमराव पाटील, आपचे संतोष नवलाखा, बजरंग सरडे, शिवाजी सातव , खर्डा शहर प्रमुख रतन डोके ,राळेभात सर दिनेश राळेभात, नगरसेवक अर्शदभाई,मोरे, क्षीरसागर, शिंदे ,शबनम सय्यद, विधाते मॅडम, शेळके मॅडम सह आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते म्हणाले की, आपण दिव्यांग आहोत म्हणजे कमजोर नाही. दिव्यांगा बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. गोरगरिब, आर्थिक दुर्बल घटक व दिव्यांगासाठी जे जे नियमात आहे ते आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. नवीन विकास आराखड्यात दिव्यांगांच्या घरकुलाचा समावेश व्हावा यासाठी प्रस्ताव करावेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांची आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणी करावी असे अवाहन यावेळी दंडवते यांनी केले.

Will submit a proposal to the Collector to get the place of the Revenue Department for the disabled  - Mininath Dandavate

जामखेड नगरपरिषद हद्दीतील दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजना पोहचवण्यासाठी प्रहारचे शहराध्यक्ष नय्यूमभाई सुभेदार आणि त्यांची टीम सातत्याने पाठपुरावा करत असते. दिव्यांग बांधवांसाठी त्यांनी हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार यावेळी बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी काढले.

जामखेड नगरपरिषदे हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवली जात आहे. म्हणूनच नगरपालिका नाशिक विभागात टाॅपवर आहे. नवीन Dpr अहवालात घरकुलांचे प्रस्ताव घेतले जाणार आहेत. दिव्यांगांच्या प्रस्तावांचा समावेश केला जाणार आहे. या घटकांना न्याय देण्यासाठी जे जे नियमात आहे ते आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही.

कोणीही वैयक्तिक लाभाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही, तसेच जामखेड नगरपरिषद हद्दीत जे व्यावसायिक गाळे बांधले जात आहेत त्यात दिव्यांगांसाठी आरक्षण देण्याची आवश्यकता आहे. ही योजना राबवण्यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असे यावेळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते म्हणाले.

दंडवते साहेब आल्यापासून जवळपास 20 लाखांच्या मदतीचे दिव्यांगांना वाटप – उगले

मिनीनाथ दंडवते हे जेव्हापासून जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून जामखेडला तेव्हापासून नगरपरिषद हद्दीतील दिव्यांगांना सातत्याने मदत मिळत आहे. पुर्वी एखाद दुसर्‍या दिव्यांगांना मदत करून सोपस्कार पार पाडले जायचे परंतू दंडवते साहेब आल्यापासून जवळपास 20 लाखांचा मदतीचे वाटप दिव्यांग बांधवांना झाले. प्रत्येक दिव्यांगांना काही ना काही मदत नगरपरिषदेकडुन मिळत आली आहे.  दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दंडवते साहेब नेहमी सकारात्मक असतात असे प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले यावेळी बोलताना म्हणाले.

किरण भोगे यांचा गौरव

जामखेड नगरपरिषद हद्दीत राबवल्या जात असलेल्या घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी नगरपरिषदेच्या घरकुल विभागाचे प्रमुख किरण भोगे हे मोठी मेहनत घेत आहेत. त्यांच्या कामाचे यावेळी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी गौरव केला.